पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदत

संग्रहित चित्र
संग्रहित चित्र

नागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा पुरवठा न झाल्याने अखेरीस पशुगणनेची मुदत महिनाभराने वाढविण्यात आली आहे. आता ३१ जानेवारीपर्यंत पशुगणनेचे काम करावयाच्या सूचना पशुसंवर्धन आयुक्‍तांनी दिल्या आहेत.

राज्यात एक ऑक्‍टोबर ते ३१ डिसेंबर असा पशुगणनेचा कालावधी होता. मात्र, त्यासाठी लागणारी टॅबसह विविध यंत्रसामग्री उशिराने प्राप्त झाल्याने आजपर्यंत केवळ निम्मीच पशुगणना झालेली आहे. वर्धा जिल्ह्यात ११२ प्रगणकांची नियुक्‍ती करण्यात आली असून ३५ पर्यवेक्षक तसेच आठ पशुसंवर्धन विकास अधिकारी पशुगणनेचे काम करीत आहेत. त्यांना १५८ मार्गदर्शक पुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे. एका प्रगणकाने दिवसभरात शंभर घरांची गणना करावी, अशा सूचनाही पशुसंवर्धन आयुक्‍तांनी दिल्या आहेत. गणना पूर्ण झाल्यानंतर इतर पथकांमार्फत त्याची पडताळणी करण्यात येणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून भेडसावत असलेल्या चारा समस्येमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी पशुधनाची विक्री करीत आहेत. २०१२ मध्ये झालेल्या पशुगणनेनंतर पुन्हा जातीनिहाय पशुगणना करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या पशुगणनेत गणना व जातीनिहाय पशुगणना एकत्रित करण्यात येत आहे. टॅबद्वारे गवळाऊ, संकरित, नागपुरी, मुऱ्हा अशी वर्गवारी निश्‍चीत करून गणना होणार आहे. टॅबद्वारे पहिल्यांदाच गणना होत असली तरी पुरेसे टॅब उपलब्ध झाले नव्हते किंवा ते उशिरा प्राप्त झाले. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत पशुसंवर्धन विभागाला पाळता आली नाही. 

टॅबचा पुरवठा उशिरा झाल्याने आजवर केवळ ५० टक्‍केच काम झाले. दरम्यान पशुगणना करताना टॅबचे चार्जिग संपल्यास फिडिंग केलेला सर्व डाटा डिलिट होईल. त्याकरिता टॅबसोतच सीमकार्ड आणि पावर बॅंकही देखील पुरविण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com