साखरेच्या दरामध्ये सुधारणांची अपेक्षा : इस्मा

साखरेच्या दरामध्ये सुधारणांची अपेक्षा : इस्मा
साखरेच्या दरामध्ये सुधारणांची अपेक्षा : इस्मा

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत साखरेचे दर कमी झाल्यामुळे कारखानदार आणि ऊस उत्पादक आर्थिक चिंतेने ग्रस्त झाले होते. अधिक उत्पादनामुळे सप्टेंबर २०१७ दर १४ टक्क्यांनी कमी झाले होते. मात्र उत्तर आणि पश्चिम भारतातील दर आता हळूहळू सुधारत असून, साखर विक्रीतही वाढ दिसून येत आहे. ही माहिती भारतीय साखर कारखानदार संघटनेने (इस्मा) केंद्रीय सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाच्या आकडेवारीचा आधार घेत बुधवारी (ता. ३) दिली.

इस्माने दिलेल्या माहितीनुसार २०१७-१८ मध्ये देशात २९.१७ दशलक्ष टन साखरेची उपलब्धता राहणार आहे. आगामी काळात मागणी २ टक्क्यांनी वाढणार असून, २५ दशलक्ष टन साखरेचा वापर होणार आहे. यामुळे ३० सप्टेंबर २०१८ अखेर ४.१७ दशलक्ष टन साखरेचा साठा राहण्याची शक्यता आहे. देशांतर्गत मागणी पुरवठ्याचे गणित लक्षात घेता यातून प्रारंभीचे दोन महिने पुरेशी साखर उपलब्ध राहणार आहे. ३१ डिसेंबरअखेर देशात १०.३२ दशलक्ष टन साखर उत्पादित झाली असून, गेल्या वर्षी या कालावधीत ८.१९ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होते. ३१ डिसेंबर २०१७ अखेर देशात ४८५ कारखाने सुरू होते.

सप्टेंबर २०१७ अखेर सरकारने तीन लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. डिसेंबर २०१७ अखेर यापैकी २ लाख ३५ हजार साखरेची आयात झाली आहे. यातून कारखान्यांनी दोन लाख टन साखर उत्पादित केली आहे.

तिसऱ्या आठवड्यात अंदाज इस्माद्वारे साखर उत्पादनाचा दुसरा अंदाज जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. २०१७-१८ मधील साखर वर्षात अद्याप शिल्लक राहिलेले गाळप, उत्पन्न, उत्पादन, ऊसस्थिती, उत्पादकता, सरासरी साखर उतारा आदींची माहिती घेऊन, तसेच उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या छायाचित्रांचा वापर करून हा अंदाज प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com