agriculture news in marathi, Expected to start 19 purchasing centers for, soyabean, moong and urad | Agrowon

सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे सुरू करणे अपेक्षित
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा यासाठी नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन, मूग आणि उडदाच्या खरेदीसाठी १९ हमी केंद्रे सुरू करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने पेरणी क्षेत्र उत्पादनाच्या अंदाजावर वरिष्ठ कार्यालयाला तसे कळवले आहे. लवकरच मंजुरी येऊन केंद्रे सुरू होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा यासाठी नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन, मूग आणि उडदाच्या खरेदीसाठी १९ हमी केंद्रे सुरू करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने पेरणी क्षेत्र उत्पादनाच्या अंदाजावर वरिष्ठ कार्यालयाला तसे कळवले आहे. लवकरच मंजुरी येऊन केंद्रे सुरू होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

खरिपातील मूग, उडीद आणि सोयाबीनचे क्षेत्र अधिक असते. यंदा पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच पुरेसा पाऊस नाही. मात्र तरीही जिल्ह्यामध्ये मूग, उडीद व सोयाबीनची पेरणी जास्त झालेली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ५४ हजार ४५३ हेक्‍टर असले तरी यंदा ६३ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. मुगाचीही सरासरीच्या दुप्पट व उडदाची तिप्पट पेरणी झाली आहे. कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्‍यात सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे.

यंदा पावसाअभावी उत्पादन घटले असले तरी हाती आलेले पीक बाजारात येऊ लागले आहे. सध्या नगरला बाजारात मुगाची दर दिवसाला सुमारे पाचशे क्विंटलपेक्षा अधिक आवक होत आहे. बाजारात शासनाने ठरवून दिलेल्या हमीदरानुसार खरेदी होणे अपेक्षित असताना खरेदी होताना दिसत नाही.

गेल्या वर्षी नाफेडअंतर्गत हमीदराने मूग, उडीद, सोयाबीन, तूर, हरभरा खरेदी करण्यासाठी हमी केंद्रे सुरू केली होती. यंदाही अशी केंद्रे सुरू करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे.

जिल्ह्यामध्ये यंदाही मूग, सोयाबीन, उडदाचे नगर जिल्ह्यामध्ये क्षेत्र अधिक आहे. त्याचे उत्पादन किती होईल याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून माहिती घेतली आहे. त्यानुसार अपेक्षित केंद्रे सुरू करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळवले आहे. केंद्रे सुरू करण्याबाबत जिल्हाभरातील संस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत.- भारत पाटील, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, नगर

अपेक्षित खरेदी केंद्रे
सोयाबीन ः वांबोरी (राहुरी), राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नगर, जामखेड, नेवासा ः अकोले, संगमनेर
मूग ः राहुरी, पारनेर, नगर, जामखेड, शेवगाव
उडीद ः राहुरी, जामखेड, नगर, कर्जत, पाथर्डी

इतर ताज्या घडामोडी
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...
केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...
सहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...
मराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...
पणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे  ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...
पुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...
खानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव  ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...
शकूबाईंच्या लढ्याला आले यश;  वनजमीन...वणी, जि. नाशिक  : शेतकरी व आदिवासींच्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद  ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...
उन्नत शेती अभियानात १५ दिवसांत १९ लाख...मुंबई : राज्यात उन्नत शेती - समृद्ध शेतकरी...
पाणी जिरविण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचा...अमरावती  ः भूगर्भात पाणी मुरून पातळी वाढावी...
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी...मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने...
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार मुंबई : होणार होणार म्हणून गेले काही...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत...मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना...