agriculture news in marathi, Expert, Crop Expert Inspection by the Officers | Agrowon

तज्ज्ञ, अधिकाऱ्यांतर्फे पीक प्रात्यक्षिक पाहणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या काही गावांमधील पीक व कीड नियंत्रणाविषयीच्या उपाययोजनांची कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि कृषीचे अधिकारी यांनी बुधवारी (ता. ५) पाहणी केली.

या पाहणीत सलग तूर, कपाशीत आंतरपीक मूग, कीड नियंत्रणासाठीचे एकात्मिक व्यवस्थापन, पारंपरिक पद्धतीने विविध पिकांच्या माध्यमातून किडींचे नियंत्रण आदींविषयी निरीक्षणे नोंदविण्यात आली.

औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या काही गावांमधील पीक व कीड नियंत्रणाविषयीच्या उपाययोजनांची कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि कृषीचे अधिकारी यांनी बुधवारी (ता. ५) पाहणी केली.

या पाहणीत सलग तूर, कपाशीत आंतरपीक मूग, कीड नियंत्रणासाठीचे एकात्मिक व्यवस्थापन, पारंपरिक पद्धतीने विविध पिकांच्या माध्यमातून किडींचे नियंत्रण आदींविषयी निरीक्षणे नोंदविण्यात आली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार, अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, उपविभागीय कृषी अधिकारी पी. आर. चव्हाण, तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी, तंत्र अधिकारी बी. एन. बोंदरवाड, कृषी पर्यवेक्षक एकनाथ मुंडे, रमेश गुंडीले, कृषी सहायक विठ्ठल बोराडे, कृषी सहाय्यिका सारिका पाटील, योगीता मनसुते आदींची उपस्थिती होती.

गेवराई शेमी येथील लिंबाजी सांगळे व मारोती ताठे, दशरथ ताठे यांच्या सलग तूर, कपाशीत आंतरपीक तूर, चिकट सापळे, फेरोमन ट्रॅप यासोबातच अंबाडी राजगीरा, मका आदी पिकाच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने कीड नियंत्रणाच्या प्रात्यक्षिकांची नोंदली गेलेली निरीक्षणे, गुलाबी बोंड अळी नियंत्रणाची अवस्था याविषयी माहिती जाणून घेतली. सलग तूर, तुरीत आंतरपीक शेवगा व भुईमूग आदी शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगाविषयीचीही माहिती तज्ज्ञ व अधिकाऱ्यांनी जाणून घेतली.

एक एकर कपाशीत आंतरपी घेतलेल्या मुगाचे जवळपास दोन क्‍विंटल उत्पादन मिळाल्याची माहिती शेतकरी दशरथ ताठे यांनी दिली. गावात जवळपास एक हजार फेरोमॅन ट्रॅप वाटप केल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. शिवाय बोंड अळीच्या नियंत्रण जनजागृतासाठी प्रचार रथ पाठविल्याचे सांगण्यात आले. भवनसह हळदा, पानवडोद इतरही शेततळे, पाऊस, त्यामुळे पिकांची अवस्था याविषयी तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली.

इतर बातम्या
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
उत्तर महाराष्ट्रात टंचाईच्या झळा तीव्रनाशिक : भूजल पातळीत वेगाने घट होत असल्याने उत्तर...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
‘वसाका`च्या गळीत हंगामास प्रारंभकळवण, जि. नाशिक : विठेवाडी येथील वसंतदादा पाटील...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
शेतीप्रश्नांसाठी तरुणांच्या चळवळीची गरज...वैराग, जि. सोलापूर : ‘‘शेतीचे प्रश्न वाढतायेत, ते...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...