agriculture news in marathi, The experts gave the advice of sustainable pomegranate farming | Agrowon

तज्ज्ञांनी दिला शाश्वत डाळिंब शेतीचा कानमंत्र
टीम अॅग्रोवन
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

जालना (प्रतिनिधी) : शाश्वत डाळिंब शेतीचा मार्ग नेमका कोणता याचा कानमंत्र तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला. निसर्गाचं देणं शेतीत कस उपयोगी पाडता येईल यासोबतच डाळिंब फळबागेचे व्यवस्थापन नेमके कसे करावे याचा वस्तुपाठ शनिवारी (ता. ११) जालन्यात पार पडलेल्या ''शाश्वत डाळिंब शेती'' विषयाच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात घालून देण्यात आला.

जालना (प्रतिनिधी) : शाश्वत डाळिंब शेतीचा मार्ग नेमका कोणता याचा कानमंत्र तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला. निसर्गाचं देणं शेतीत कस उपयोगी पाडता येईल यासोबतच डाळिंब फळबागेचे व्यवस्थापन नेमके कसे करावे याचा वस्तुपाठ शनिवारी (ता. ११) जालन्यात पार पडलेल्या ''शाश्वत डाळिंब शेती'' विषयाच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात घालून देण्यात आला.

अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संशोधन संघ, पुणेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्‌घाटन सत्राला जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे अध्यक्ष शहजीराव जाचक, अनुभवी शेतकरी भागवत पवार, राहुल रसाळ, भाऊसाहेब काटे, दिलीप अहिरेकर, राजेंद्र जठार, पुष्कर गुगरदरे व राहुल जठार आदींची उपस्थिती होती.

उद्‌घाटन सत्रानंतर औरंगाबाद विभागातील शेतकऱ्यांच्या डाळिंब शेतीतील प्रश्नांचा तास झाला. निर्यातक्षम मालाचे उत्पादन कसे घ्यावे, छाटनीची पद्धत, निर्यातीसाठी बहार नियोजन नेमके कसे करावे, खताचे व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन मार्केटचा नेमका अंदाज कसा घेता येईल आदींविषयी मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील अनुभवी शेतकऱ्यांशी साधलेल्या प्रश्नरूपी संवादातून जाणून घेतले.

डॉ. हरिहर कौसाडीकर यांनी अन्नद्रव्य व बाहेर व्यवस्थापनातील मराठवाड्यातील डाळिंब उतापादकाना जाणवणाऱ्या समस्या, त्याची कारणे, त्यावरील उपाय यावर प्रकाश टाकला. सूक्ष्म अन्नद्रव्याची जमिनीतील कमतरता जाणून घेऊन त्यानुसार खताचे व्यवस्थापन आवश्यक आहे. रेस्ट काळात आवश्यक खत व फवारणीचे तंत्र याविषयी घ्यावयाची काळजी, रोगावर नंतर उपाय करण्यापेक्षा आधीच उपाय नेमके कसे योजावे यावरही श्री. कौसाडीकर यांनी मार्गदर्शन केले.

दीपक जंजिरे यानी ठिबक सिंचन प्रणाली व ऑटोमायजेशन याविषयी माहिती दिली. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र पुणेचे सहयोगी संचालक डॉ. विनय सुपे यांनी शाश्वत डाळिंब शेतीचा नेमका मार्ग कोणता याविषयी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले.

डॉ. सुपे म्हणाले, शाश्वत डाळिंब शेतीसाठी जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे आहे. गुटीनेच डाळिंबाची लागवड करावी. यामध्ये प्रतिकारक्षमता जास्त असते. झाडाची मूळ आणि पान फळांचा आकार वाढवितात. त्यामुळे मूळ आणि पान सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे. कनॉपी व्यवस्थापन महत्त्वाचे असून पानांचा टीएसएस १२ च्या पुढे आल्यास झाड हेल्दी समजा. झाडाची पाण्याची गरज ओळखून पाण्याचे व्यवस्थापन आवश्यक असल्याचे सांगून निसर्गदत्त पद्धतीने फळबाग व बहर व्यवस्थापन नेमके कशा पद्धतीने करता येईल याची माहिती डॉ. सुपे यांनी दिली.

इतर बातम्या
आषाढीच्या महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव...सोलापूर  : आषाढी सोहळ्यातील शासकीय...
लाभार्थी निवडीसाठी ग्रामसभेत सोडतराहुरी, जि. नगर : चिंचविहिरे येथे कृषी विभागाच्या...
विमा तर उतरविला; पण पावती आली कोरीऔरंगाबाद : नावाला ऑनलाइन मात्र सारंच ऑफलाइन...
सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...
सोलापुरात दुसऱ्या दिवशीही मराठा...पंढरपूर, जि. सोलापूर  ः मराठा क्रांती...
आषाढी एकादशीनिमित्ताने पुण्यात...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
अचलपुरातील कारली पोचली थेट दुबईच्या...अमरावती : भाडेतत्त्वावरील शेतीत कारली लागवड करीत...
गडहिंग्लज तालुक्यात ओढ्याचे पाणी सोडले...कोल्हापूर : ओढ्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा...
परभणीतील १७ तलावांमधील पाणीसाठा...परभणी : जिल्ह्यातील २२ पैकी १७ लघू तलावांतील...
देशातील जलाशयांमध्ये ३२ टक्के पाणीसाठानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या ९१ जलशयांमध्ये...
तालुका कृषी कार्यालयाचा कारभार हाकतात...गडचिरोली ः दुर्गम, आदिवासीप्रवण भागात कृषी...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत...पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...
तीन जिल्ह्यांत खरिपाची १४ लाख ८१ हजार...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
आज आषाढी एकादशीपंढरपूर :  त्रिविध तापांची झाली बोळवण ।...
विदर्भात अतिवृष्टीचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या...
शासकीय महापूजेला मुख्यमंत्री जाणार नाहीतपुणे - आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना...
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
सोलापूर जिल्हा बॅंक आर्थिक अडचणीत नाही सोलापूर  : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
पीकविम्यापासून ४५ हजार शेतकरी वंचित जळगाव : जिल्ह्यात मागील हंगामात राबविलेल्या खरीप...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...