agriculture news in Marathi, exploitation of milk producers due to confusion of SNF, Maharashtra | Agrowon

‘एसएनएफ’च्या संभ्रमामुळे दूध उत्पादकांची लूट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

पुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याबाबत दर्जाचे निकष ठरविताना ‘एसएनएफ’बाबत संभ्रमाची स्थिती ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या बिलातून मनमानी पद्धतीने कपात केली जात आहे. त्यामुळे ‘एसएनएफ’च्या संभ्रमाचा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याची तयारी दुग्धविकास खात्याने केली आहे. 

पुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याबाबत दर्जाचे निकष ठरविताना ‘एसएनएफ’बाबत संभ्रमाची स्थिती ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या बिलातून मनमानी पद्धतीने कपात केली जात आहे. त्यामुळे ‘एसएनएफ’च्या संभ्रमाचा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याची तयारी दुग्धविकास खात्याने केली आहे. 

दुधाची गुणप्रत ठरवितांना राज्य शासनाने फक्त फॅटचे निकष जाहीर केले. मात्र, ‘एनएनएफ’बाबत कोणतीही माहिती न दिल्यामुळे राज्यात संभ्रमाची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे ८.५ एसएनएफच्या खाली खासगी डेअरीचालक आणि काही सहकारी दूध संघदेखील मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या बिलात कपात करीत आहेत. 

महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की हा मुद्दा राज्याच्या दुग्धविकास आयुक्तांच्या बैठकीत उपस्थित झाला होता. ८.५ ‘एसएनएफ’च्या खाली प्रतिपॉईंटला एक रुपया कपात करण्याची एकमुखी सूचना आम्ही दुग्धविकास खात्याकडे केली आहे. त्यामुळे ‘एनएनएफ’चा संभ्रम लवकरच दूर होईल. 

दरम्यान, दुग्धविकास आयुक्त राजीव जाधव यांनी ‘एनएनएफ’बाबत दुध संघ व डेअरीचालकांकडून आलेल्या सूचना थेट दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्याकडे मांडण्याचा निर्णय घेतला आहे. श्री. जानकर यांच्याकडून ‘एनएनएफ’चा कपात दर निश्चित झाल्यानंतर हा विषय पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवला जाणार आहे. 

‘‘मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतरच एनएनएफच्या कपात दराची घोषणा केली जाणार आहे. तोपर्यंत बाजारपेठेतील घडामोडींवर आमचे कोणतेही नियंत्रण नसेल. बाजारात कमी एसएनएफसाठी दोन रुपयांपर्यंत कपात सुरू आहे. मात्र, त्यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण सध्या तरी नाही. जीआर निघाल्यानंतरच हा संभ्रम दूर होईल,’’ अशी माहिती दुग्धविकास विभागाच्या सूत्रांनी दिली. 

 कपातीला न घाबरता निर्भेळ  मुद्दा महत्त्वाचा
कमी ‘एसएनएफ’साठी एक रुपया कपात होत असल्यास बाऊ करण्याचे अजिबात कारण नाही. त्यामुळेच निर्भेळ दूध घालण्याची सवय लागणार आहे. दुधाची प्रत चांगली असल्यास शेतकऱ्यांना योग्य भाव दिला जातो. शासनाच्या सुधारित धोरणामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी एकप्रकारे हमीभाव मिळाला आहे. त्यामुळे आता दर्जेदार दुधाचा पुरवठादेखील झाला पाहिजे, असे महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले. 

१५ वर्षे शेतकऱ्यांना लुटले; आता बस करा 
केंद्र सरकारने दुधाची गुणप्रत ३.२ फॅट व ८.३ ‘एसएनएफ’ अशी कायदेशीररीत्या घोषित केली आहे. तरीही शेतकऱ्यांना लुटण्यासाठी कमी ‘एसएनएफ’चा मुद्दा पुढे करून आमची लूट होते आहे. गेली १५ वर्षे आमची लूट झाली असून, आता लुटीचा धंदा बंद करावा. दर्जेदार दूध शेतकरी देत असून ८.३ ‘एसएनएफ’पर्यंत एक पैसासुद्धा आता कपात करू नये. अन्यथा, शेतकरी पुन्हा सरकारच्या विरोधात जातील, असे अहमदनगर कल्याणकारी दूध संघांचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी म्हटले आहे. 

 

इतर अॅग्रो विशेष
केरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...
कधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...
मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...
ग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...
कोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...
खारपाणपट्ट्यात पावसाच्या खंडाने खरीप...पावसात कुठे १७ दिवस तर कुठे २२ दिवसांचा खंड...
केळी उत्पादक कंगाल; व्यापारी मालामालजळगाव ः जिल्ह्यात केळीचे जे दर जाहीर होतात,...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचे धूमशानपुणे : अनेक दिवसांच्या खंडानंतर राज्यात गेले तीन...
`मोन्सॅन्टोला नुकसानभरपाईचे आदेश हे...युरोपियन संघ ः मॉन्सॅन्टो या बलाढ्य बहुराष्ट्रीय...
कामगंध सापळ्यांमध्ये होतेय ‘बनवाबनवी’अकोला ः बोंड अळीमुळे गेल्या हंगामात झालेले नुकसान...
वर्षभर १५ भाजीपाल्यांसह फळबागांची...रसायन अंश विरहीत आरोग्यदायी अन्नाची निर्मिती करून...
लौटकर आऊँगा...! अटलजींना साश्रू नयनांनी...नवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...
धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू...झळा दुष्काळाच्या : जि, परभणी यंदा पावसात कसा जोर...
राज्यात सर्वदूर पाऊसपुणे ः राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (...
बेबाकी प्रमाणपत्राशिवाय राष्ट्रीय...मुंबई: पाऊस न पडल्याने आधीच त्रस्त असलेल्या...
मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर सर्वदूर पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर...
अजातशत्रूदेशाच्या राजकारणात आपल्या शालीन, सभ्य राजकारणाने...
बोंड अळी नियंत्रणासाठी...पुणे : राज्यात कपाशीतील बोंड अळीचे संकट वाढण्याची...
‘अटलपर्वा’चा अस्तनवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
शेततळी झाली, शेती बागायती झालीसध्या राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...