agriculture news in Marathi, export of banana in kashmir from jalgaon, Maharashtra | Agrowon

जळगावची केळी काश्मिरात दाखल
चंद्रकांत जाधव
रविवार, 3 डिसेंबर 2017

केळीची पाकिस्तान किंवा आखाती राष्ट्रांमधील निर्यात सुरू व्हावी, चालना मिळावी यासाठी कृषी, विदेश व वाणिज्य मंत्रालयाने धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा. त्याचा लाभ देशभरातील केळी उत्पादकांना होईल. 
- नरेंद्र पाटील, केळी उत्पादक, विटनेर, ता. चोपडा, जि. जळगाव

जळगाव ः जिल्ह्यातील केळी देशातील संवेदनशील राज्य म्हणून परिचित असलेल्या जम्मू व काश्‍मीरमध्ये दाखल झाली आहे. जिल्ह्यातून रोज जवळपास तीन हजार क्विंटल केळी मोठे कंटेनर, ट्रकद्वारे तेथे पोचत अाहे. त्यामुळे दर्जेदार केळी उत्पादकांना अधिक उत्पन्न मिळत आहे. परंतु पाकिस्तानमधील केळी निर्यात मात्र ठप्पच आहे. त्यामुळे दररोजचा सात ते आठ लाखांचा फटका केळी उत्पादकांना बसत आहे. 

जम्मू व काश्‍मीरमध्ये मध्यंतरी पावसाळ्यानंतर निर्माण झालेली समस्या व तेथे दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी सुरू असलेले ऑपरेशन ऑलआउट यामुळे केळीची मागणी फारशी नव्हती. व्यापारीही केळी मागविण्याचे धाडस करीत नव्हते. केळी जायची, पण ती जम्मूपर्यंतच पोचू शकत होती. तेथून काही प्रमाणात श्रीनगगरपर्यंत केळी लहान वाहनांनी जायची. परंतु अलीकडे वाढलेली थंडी आणि पर्यटनाचे दिवस लक्षात घेता काश्‍मीरमधून केळीची मागणी वाढली असून, सावदा (ता. रावेर, जि. जळगाव), वाघोदा बुद्रुक (ता. रावेर) व रावेरातून काश्‍मीर येथे बॉक्‍समध्ये केळी पाठविली जात आहेत. 

२०० रुपये दर अधिक 
तेथे निर्यातीसाठी टिश्‍यू रोपांच्या बागेतील दर्जेदार केळी व्यापारी खरेदी करीत असून, मोठे कंटेनर, ट्रकमध्ये तेथे केळी पाठविली जात आहे. केळीच्या घडातून दांडा वेगळा करून बॉक्‍समध्ये फण्या भरल्या जातात. केळी उत्पादकांना प्रचलित दरांपेक्षा २०० रुपये क्विंटलमागे अधिक मिळत असल्याची माहिती मिळाली. 

पाकिस्तानमधील निर्यात ठप्प
सावदा (जि. जळगाव) येथील अनेक केळी व्यापारी श्रीनगर (काश्‍मीर) येथील व्यापाऱ्यांच्या माध्यमातून पाकिस्तानला पाठवीत होते. तेथे रोज सुमारे अडीच ते तीन हजार क्विंटल केळी पाठविली जात होती. परंतु पाकिस्तानमधील केळी निर्यात मागील चार- पाच महिन्यांपासून ठप्प आहे. केळीच्या बदल्यात 
पाकिस्तानमधून बदाम, काजू यायचे. ते श्रीनगरमधील व्यापारी स्वीकारायचे. त्या बदल्यात श्रीनगरमधील व्यापारी किंवा मध्यस्थ सावदा येथील व्यापाऱ्यांना पैसे द्यायचे. पाकिस्तानमधील केळी निर्यातीमुळे केळी उत्पादकांनाही क्विंटलमागे २५० रुपये अधिक मिळायचे. पण तेथील निर्यात ठप्प असल्याने रोजचा जवळपास सात लाख रुपये फटका केळी उत्पादकांना बसत आहे. 

प्रतिक्रिया
केळीची पाकिस्तानमधील निर्यात ठप्पच आहे. पाच महिने झाले, तेथे केळी जात नाही. मध्यंतरी काश्‍मीरमधून कमी मागणी होती. परंतु सध्या काश्‍मीरमध्ये श्रीनगर व इतर भागांत रोज सावदा, रावेरातून केळी जात असून, ती यंदा बॉक्‍समध्ये प्रथमच अनेक जण पाठवीत आहेत. तेथे दर्जेदार केळीला मागणी वाढली आहे. 
- सुनील पाटील, केळी व्यापारी, सावदा, ता. रावेर, जि. जळगाव

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
इंधनाचा भडकाएप्रिल महिन्यात राज्यातील तापमान ४० अंश...
हमीभावाने खरेदीत हवी विश्वासार्हताशासनाची कार्यक्षमता व पारदर्शकता वाढविण्याच्या...
उन्हामुळे लाही लाहीपुणे : वाढलेल्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत...
साखरेवर कर, इथेनॉलवरील जीएसटी कमी...नवी दिल्ली ः देशात सध्या साखरेचे दर पडल्याने...
तूर खरेदीत राज्याला एक हजार कोटींचा...मुंबई ः अगदी सुरवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात...
व्यावसायिक पिकांसह ‘हायटेक’ फुलशेतीचा...डोंगरकडा (जि. हिंगोली) येथील नागेश खांडरे या कृषी...
अन्य खात्याच्या मंत्र्यांचाही ‘कृषी’...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर अधिकाऱ्यांना...
दख्खनी मेंढीची लाेकरदेखील दर्जेदारपुणे : आॅस्ट्रेलियातील मेरिनाे मेंढीची लोकर...
बॅंकांतील घोटाळ्याने पतशिस्त बिघडत नाही...शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर पतशिस्त बिघडते असा...
दूध करपतेय, लक्ष कोण देणार?गेल्या वर्षात तूर, सोयाबीन, कापूस या मुख्य शेती...
राज्यातील धरणसाठा ३३.८६ टक्क्यांवरपुणे  : तापमान वाढताच राज्यातील धरणांचा...
अादेशाअभावी तूर खरेदी बंदचअकोला ः मुदत संपल्याने बुधवार (ता. १८) पासून बंद...
उद्योगांमध्ये वापर होणाऱ्या साखरेवर कर...कोल्हापूर  : देशात तयार होणाऱ्या साखरेपैकी...
तापमानाचा पारा चाळीशीपारपुणे  : राज्यात उन्हाचा चटका वाढतच असून,...
नागरी सेवा मंडळ बनले दात नसलेला वाघपुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर अधिकाऱ्यांना...
ध्यास गुणवत्तापूर्ण केळी उत्पादनाचा...जळगाव जिल्ह्यातील केऱ्हाळे बुद्रुक (ता. रावेर)...
जमीन सुपीकतेबाबत असे भान आपल्याला कधी?जी जमीन भरभरून उत्पादन देते ती सुपीक जमीन, ही...
पंजाबचा आदर्शमागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास...
करवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...
पशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे  : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...