agriculture news in Marathi, Exporter from Egypt visited village in smart village, Maharashtra | Agrowon

‘स्मार्ट व्हिलेज’मधील गावांत इजिप्तच्या निर्यातदारांचा दौरा
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

सध्या देशात संकरित जनावरांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, देशी दूध व देशी तुपाला अधिक मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी  देशी गाईंची पैदास वाढविणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन देशी गाईंचे दूध शहरात पाठविल्यास चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल. 
- अभिजित पवार, व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह

टाकळी हाजी/आळेफाटा, जि. पुणे ः सकाळ माध्यम समूहातर्फे ‘सकाळ ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज’ प्रकल्पामध्ये निवड झालेल्या पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता. शिरूर) व पारगावतर्फे आळे (ता. जुन्नर) या गावांना इजिप्तमधील निर्यातदार तौफिक अहमद व हातेम इल इझावी यांनी ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्यासमवेत भेट दिली. 

इझावी हे इजिप्तमधील पिको ॲग्रिकल्चर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, तर अहमद हे ‘डाल्टेक्‍स कॉर्प’चे व्यावसायिक संचालक आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उत्पादित मालाची पाहणी करत उत्पादन खर्च, एकरी उत्पादन; तसेच बाजारभावाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. नव्या तांत्रिक युगात उत्पादन खर्च व बाजारभाव यावर शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देण्यास त्यांनी सांगितले.

केळी, कलिंगड, डाळिंब, द्राक्षाच्या फळबागांना भेट दिली. ठिबकवर पाण्याचे व्यवस्थापन करून घेतलेले मिरची आणि कारल्याच्या शेतीची माहिती घेतली. गायीच्या गोठ्याची पाहणी करून पूरक व्यवसाय म्हणून केल्या जाणाऱ्या दुग्धव्यवसायाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. सकाळ ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्पामध्ये पारगावतर्फे आळे, बोरी बुद्रुक, वडगाव कांदळी, काळवाडी ही जुन्नर तालुक्‍यातील आणि टाकळी हाजी या शिरूर तालुक्‍यातील गावाचा समावेश आहे. अभ्यास दौऱ्यात शिष्टमंडळाने टाकळी हाजीमध्ये ‘सकाळ’च्या तनिष्का गटाच्या कामांचीही माहिती घेतली. 

इतर अॅग्रो विशेष
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
राज्यात नीचांकी हरभरा खरेदीमुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक...
सीमेवरील तणावाचा केळी निर्यातीला फटकारावेर, जि. जळगाव : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळ...
ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल :...जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून...