agriculture news in marathi, extend date for Tur repurchase demands Swabhimani Shetkari Sanghatana | Agrowon

तूर खरेदीला मुदतवाढ न दिल्यास तीव्र आंदोलन करू
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

वाशीम  : शासनाने दिलेली तूर खरेदीची मुदत मंगळवारी (ता. १५) संपली. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांची तूर विक्री व्हायची अाहे. तुरीची विक्री न झाल्यास शेतऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे तूर खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली अाहे. 

वाशीम  : शासनाने दिलेली तूर खरेदीची मुदत मंगळवारी (ता. १५) संपली. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांची तूर विक्री व्हायची अाहे. तुरीची विक्री न झाल्यास शेतऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे तूर खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली अाहे. 

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नाफेडच्या वाशीम जिल्ह्यातील केंद्रांवर अद्यापही हजारो शेतकऱ्यांची तूर प्रतीक्षेत आहे. तसेच हजारो शेतकऱ्यांच्या घरात तूर अद्यापही पडून आहे. तूर खरेदीला मुदतवाढ न दिल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत. सोयाबीनला योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आधीच आर्थिक नुकसान झाले आहे. नाफेडद्वारे होत असलेल्या तूर खरेदीत अनेक अडचणी येत असल्याने खरेदी संथगतीने होत होती. त्यामुळे अद्यापही निम्म्या शेतकऱ्यांची तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे तूर खरेदीला तत्काळ मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भागवत मापारी, सतीश इढोळे, देवा बरडे, सुनील जोगदंड, प्रदीप मोरे आदींनी दिला आहे.

इतर ताज्या घडामोडी
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...
नाशिकला स्वाईन फ्ल्यूचा कहर, 24...नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने...
आज मराठवाडा मुक्तीदिन ! संग्रामाला झाली...15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला...
पेट्रोल दराची शंभरीकडे वाटचाल मुंबई : महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या...
वऱ्हाडात पिकांना वाढती उष्णता सोसवेनाअकोला  ः गेल्या अाठ दिवसांपासून कमाल...
शेतीमाल प्रक्रियेला चालना देण्यासाठी...भेंडा, जि. नगर  : बीव्हीजी ग्रुपने स्वच्छता...
साताऱ्यात ११७७ शेततळ्यांची कामे पूर्णसातारा  ः मागेल त्याला शेततळे योजनेतून...
इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावरऔरंगाबाद : इंधन दरवाढीचा थेट आघात आता शेतीवरही...
शेतमाल वाहतुकीच्या दरात वाढजळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे...