agriculture news in marathi, Extend exports using available resources | Agrowon

उपलब्ध संसाधनांचा वापर करून निर्यात वाढवा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

लखमापूर, जि. नाशिक : देशात निर्यातीसाठी पोषक संधी आणि उत्कृष्ट शेती असतानाही जगाच्या पातळीवर शेतीप्रधान देशाची निर्यात मात्र दोन ते तीन टक्के आहे. ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर करून निर्यात वाढवा, असे आवाहन नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. दिंडोरी तालुक्‍यातील जानोरी येथे हॉलकॉन येथील कृषी-फलोत्पादक व निर्यातदार यांच्यासाठी निर्यातीस वाव देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते.

लखमापूर, जि. नाशिक : देशात निर्यातीसाठी पोषक संधी आणि उत्कृष्ट शेती असतानाही जगाच्या पातळीवर शेतीप्रधान देशाची निर्यात मात्र दोन ते तीन टक्के आहे. ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर करून निर्यात वाढवा, असे आवाहन नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. दिंडोरी तालुक्‍यातील जानोरी येथे हॉलकॉन येथील कृषी-फलोत्पादक व निर्यातदार यांच्यासाठी निर्यातीस वाव देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते.

श्री. झगडे म्हणाले, की शेतकरी व निर्यातदार यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून निर्यात केली, तर नाशिक राज्यातच नव्हे तर देशात प्रथम क्रमांकावर जाण्यायोग्य परिस्थिती येथे स्थानिक पातळीवर आहे. त्यासाठी उपयुक्त साधन सामग्रीचा पूर्ण उपयोग केला गेला पाहिजे.

देशात निर्यातीसाठी पोषक संधी व उत्कृष्ट शेती असतानाही जगाच्या पातळीवर शेतीप्रधान देशाची निर्यात मात्र दोन ते तीन टक्के आहे. ही बाब चिंताजनक आहे. निर्यातीसाठी निर्यातदारांना व शेतकऱ्यांना आवश्‍यक सर्व सुविधा हॉलकॉनमध्ये आहे; मात्र तरीही त्याचा पाहिजे त्या प्रमाणात वापर होत नाही.

जो व्यापार होतो तोही बऱ्यापैकी मुंबई मधून होतो. यामुळे वेळ व खर्च वाढतो. मात्र अपेक्षित माल व्यापाऱ्यांना मिळत नसल्याने ते मुंबई मधूनच कारभार हाकतात. यासाठी व्यापाऱ्यांनी ग्राऊंड पातळीवरून काम करावे व शेतकऱ्यांनी अवश्‍यक त्या मालाची पूर्तता केल्यास शेतकरी व व्यापाऱ्यांना पैसे मिळतील, असेही महेश झगडे यांनी सांगितले.

या वेळी कृषी विभागाचे अधिकारी मासाळकर यांनी अपेडाच्या वतीने सुरू असलेल्या ग्रेपनेट व व्हिजनेट प्रणाली समजून सांगत निर्यातीमधील संधी आणि सध्याची तुलनात्मक स्थिती विशद केली. विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांनीही मार्गदर्शन केले.

हॉलकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर सेन यांनी निर्यातीसाठी उपलब्ध असलेल्या हॉलकॉनमधील सुविधांची माहिती देऊन त्याचा फायदा घेण्याची विनंती केली. या वेळी विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम जगताप आदी उपस्थित होते.

इतर बातम्या
जमीन आरोग्यपत्रिकेच्या गुणात्मक कामाकडे...पुणे  : राज्यात शेतकऱ्यांना जमीन...
बारामती कृषी महाविद्यालय देशात रोल मॉडेलबारामती, जि. पुणे ः येथील कृषिक प्रदर्शनासाठी...
'शुगरकेन हार्वेस्टर'ला अनुदान देण्यास...पुणे  : राज्यात ऊसतोडणीसाठी वापरल्या...
सांगली जिल्ह्यात तूर काढणी अंतिम...सांगली : जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ,...
मका विक्रीच्या रकमेसाठी जळगावमधील...जळगाव ः जिल्ह्यात खरिपातील मका विक्रीचे...
तीन जिल्ह्यांत ८ लाख जमीन...परभणी : कृषी विभागाच्या मृदा आरोग्यपत्रिका वितरण...
भरपाईबाबत समित्यांचे निष्कर्ष बियाणे...पुणे : राज्यात गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान...
कापूस पिकासाठी यवतमाळ जिल्हा पोषक नाहीनागपूर : यवतमाळ जिल्ह्यात उथळ ते मध्यम खोल जमिनी...
गडचिरोली जिल्ह्यात दुष्काळ जाहीर...गडचिरोली : कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या...
संपूर्ण कर्जमाफी; 'स्वामिनाथन'साठी...मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी, आत्मसन्मान योजना...
वाटाण्याच्या मुळांतील वैशिष्ट्यपूर्ण...पिकांची पांढरी मुळे ही खतांच्या शोषणामध्ये मोलाची...
साखर कारखानदारीला ५ हजार कोटींचा तोटाभवानीनगर, जि. पुणे ः साखरेच्या घसरलेल्या भावाचा...
रामदेव बाबाच खरे ‘लाभार्थी’ : अशोक...मुंबई  : ‘आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ४७ टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांमध्ये...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या...औरंगाबाद : बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या...
साडेचार लाख टन तुरीची महाराष्ट्रात...मुंबई  ः महाराष्ट्र हे देशात महत्त्वाचे तूर...
उस्मानाबाद ९.४ अंशांवरपुणे ः उत्तरेकडून थंड वारे कमी-अधिक प्रमाणात वाहत...
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या केंद्राचा...मुंबई : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील चौथ्या...
कृषीचा पतपुरवठा यंदा वाढण्याचे संकेतनवी दिल्ली ः देशातील शेतीसमोरील प्रश्न दिवसेंदिवस...
सीआयबीआरसी, कृषी, आरोग्य विभागावर...अमरावती ः विषबाधाप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या...