agriculture news in marathi, Extension of the Vangas of Jalgaon in the district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात भरिताच्या वांग्यांचा हंगाम लांबला
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

जळगाव : राज्यात प्रसिद्ध असलेल्या भरिताच्या वांग्यांचा हंगाम यंदा कमी पावसासह विषम वातावरणामुळे लांबणीवर पडला. सध्या बाजारात हव्या त्या प्रमाणात वांगी उपलब्ध होत नसून, दिवाळीलाही वांगी उपलब्ध होणार नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जळगाव : राज्यात प्रसिद्ध असलेल्या भरिताच्या वांग्यांचा हंगाम यंदा कमी पावसासह विषम वातावरणामुळे लांबणीवर पडला. सध्या बाजारात हव्या त्या प्रमाणात वांगी उपलब्ध होत नसून, दिवाळीलाही वांगी उपलब्ध होणार नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

विषम वातावरण व इतर कारणांचा फटका सर्वाधिक प्रमाणात जळगाव तालुक्‍यातील आसोदे, भादली, तरसोद, नशिराबाद भागाला बसला आहे. वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांनी शेंडे खुडले. यामुळे झाडांची उंची कमी झाली आहे. काही शेतकऱ्यांनी दीड महिन्यापूर्वी पाऊस नसल्याने दुबार लागवड केली होती. यामुळे काही ठिकाणी पीक अजून फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. दरवर्षी दिवाळी सणाला भरीताची वांगी बाजारात अधिक प्रमाणात येतात. कारण भरीताच्या वांग्यांचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेणाऱ्या यावल तालुक्‍यातील बामणोद, पाडळसे, भालोद, न्हावी, सांगवी बुद्रुकसह जळगाव तालुक्‍यातील आसोदे, तरसोद, विदगाव, भादली, नशिराबाद व इतर भागातूनही आवक सुरू होते.

 भरीताच्या वांग्याची लागवड पावसाअभावी जुलैमध्ये होऊ शकली नाही. ऑगस्टमध्येही पावसाचा खंड राहिला. सप्टेंबर महिनाही अर्धाअधिक कोरडा गेल्याने पावसाचे पाणी हव्या त्या प्रमाणात पिकाला मिळाले नाही. ढगाळ व थंड वातावरण पिकाला अनुकूल असते; परंतु सप्टेंबरपासून आतापर्यंत उष्णताच अधिक राहिली. भिज पाऊसही फार दिवस नव्हता. यामुळे रोपांना फटका बसला. नांग्या भरण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली. उत्पादन खर्च वाढला; परंतु हंगाम अजूनही अपेक्षित नसल्याने वांगी उत्पादक अडचणीत आले आहेत.

इतर अॅग्रो विशेष
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...