agriculture news in marathi, The extent of the decline in onion cultivation in Khandesh | Agrowon

खानदेशात कांदा लागवड निम्म्याने घटण्याचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे. कांदा पट्ट्यात विहिरींची जलपातळी कमी झाल्याने कांदा लागवड कमी होणार असून, यंदा रोपवाटिकादेखील कमी आहेत.

जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड निम्म्याने घटेल, असा अंदाज आहे. कांदा पट्ट्यात विहिरींची जलपातळी कमी झाल्याने कांदा लागवड कमी होणार असून, यंदा रोपवाटिकादेखील कमी आहेत.

जळगाव जिल्ह्यात कांद्यासाठी चोपडा तालुक्‍यातील अडावद, धानोरा, पंचक, खर्डी, वर्डी, मंगरूळ, लासूर, चौगाव भाग प्रसिद्ध आहे. या भागात जलसंकट आहे. कूपनलिका आटल्या असून, आतापासूनच पिकांचे सिंचन करणे अशक्‍य झाले आहे. चोपडा तालुक्‍यात फक्त तापी काठावर पाणीसाठे मुबलक आहेत. यावल तालुक्‍यात किनगाव, डांभुर्णी, साकळी, वढोदा, चिंचोली भाग प्रसिद्ध आहे. या भागात वढोदा व सातपुडा पर्वतालगतच्या भागात कूपनलिकांचे पाणी कमी झाल्याने कांदा लागवड निम्मी कमी होईल, असे चित्र आहे. फक्त डांभुर्णी, किनगाव भागात लागवड बऱ्यापैकी असणार आहे.
रावेर तालुक्‍यात कांदा लागवड फारशी वाढणार नाही. कारण केळी लागवड यंदा रावेरात अधिक होईल. तसेच धरणगाव, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल या भागातही जलसाठे कमी झाले आहेत. फक्त गिरणाकाठी जलसाठे सध्या टिकून आहेत. चाळीसगाव तालुक्‍यात कांदा लागवड कमी होईल. कारण या भागात रोपवाटिका मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहेत.

धुळे जिल्ह्यात शिरपूर, धुळे, शिंदखेडा व साक्री या भागात कांदा लागवड केली जाते. धुळे तालुक्‍यातील कापडणे, न्याहळोद, लामकानी, जापी, कौठळ भागात जलसंकट आहे. अर्धा तासही विहिरी चालत नाहीत. फक्त नेर, कुसुंबा भागात स्थिती बरी आहे. साक्री तालुक्‍यातील पिंपळनेरात लागवड बऱ्यापैकी होईल. परंतु इतर भागात जलसंकट आहे. शिंदखेडा तालुक्‍यात चिचवार, विखरण भागात कांदा लागवड अत्यल्प आहे. पुढे लागवडच होणार नाही, अशी स्थिती आहे. फक्त शिरपुरातील तापीकाठावरील गावांमध्ये कांदा लागवड होईल. नंदुरबारात उन्हाळ कांदा लागवड तळोदा, शहादा व नंदुरबारात काही ठिकाणी केली जाते. परंतु यंदा नंदुरबार व शहादा तालुक्‍यांचा पूर्व भाग आवर्षणग्रस्त असल्याने कांदा लागवड जिल्ह्यात ५०० हेक्‍टरदेखील होणार नाही, असे सांगितले जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
मांजरीत शेवंती दिनास प्रारंभ; १५०...पुणे : पुष्प संशोधन संचालनालयाच्या वतीने आज...
राजस्थानमध्ये सध्याचा कौल काँग्रेसच्या...जयपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान...
तेलंगणमध्ये टीआरएस, काँग्रेसमध्ये काँटे...हैदराबाद : तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती (...
छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवररायपूर : छत्तीसगडमध्ये चेहरा नसतानाही काँग्रेसने...
मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये...भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आव्हान...
संत्रा, मोसंबी व लिंबू सल्लाअांबिया बहर व्यवस्थापन ः अांबिया बहराच्या...
गुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजनासध्या सर्वत्र कापसाची वेचणी सुरू आहे. डिसेंबर...
धुळे महापालिकेत सत्तांतर, भाजपला मोठे यशधुळे : धुळे महापालिकेत भाजपने ७४ पैकी ५० जागांवर...
खानदेशातील दूध उत्पादकांना कमी दराचा...जळगाव : खानदेशात सहकारी संघ आणि खाजगी डेअऱ्या...
कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची मागणीधुळे : कांद्याची लागवड खानदेशात वाढत आहे....
सोलापुरात बावीस रुपयांच्या आतच दूध दरसोलापूर : शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
कोल्हापुरात दूधदरात कपात नाहीकोल्हापूर : सध्या अनुदानाच्या मुद्द्यावरून...
परभणीत दूध संकलनात वाढ; दरकपातीमुळे...परभणी ः दुष्काळी परिस्थिती तसेच शासकीय दूध...
सरकारला कृषी धोरणावरच बोलायला लावू ः...शिर्डी, जि. नगर : देश आणि राज्यातील शेतकरी अडचणीत...
धुळे जिल्ह्यात रब्बी पीककर्ज वितरण...जळगाव  ः खानदेशात खरिपात जसे बॅंकांनी...
सांगलीत अनुदान रक्कम येईपर्यंत दूधदरात...सांगली ः जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे ३५ दूध...
‘महाएफपीसी’ करणार ५ हजार टन कांदा संकलनपुणे  ः कमी झालेल्या कांदा स्थिरता...
पुणे विभागात पाण्याअभावी ज्वारीचे पीक...पुणे   ः कमी पावसामुळे रब्बी ज्वारीला...
राज्य सेवा आयोगाकडून ३४२ पदांच्या...मुंबई : राज्य सेवा आयोगाकडून शासनाच्या विविध...
वऱ्हाड खासगी डेअरींकडून दूध दरकपातीची...अकोला   ः उत्पादनवाढीचे कारण देत खासगी दूध...