agriculture news in marathi, Failure to continue market committees | Agrowon

बाजार समित्या सुरू ठेवण्यात अपयश
टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

जळगाव :जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाची खरेदी जवळपास ठप्पच आहे. बाजार समित्यांच्या संचालकांनी व्यापाऱ्यांची बाजू सांभाळून लिलाव सुरू ठेवण्याचे प्रयत्न मागील दोन दिवस केले, परंतु अनेक व्यापारी खरेदीच करीत नसल्याची स्थिती आहे.

जळगाव :जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाची खरेदी जवळपास ठप्पच आहे. बाजार समित्यांच्या संचालकांनी व्यापाऱ्यांची बाजू सांभाळून लिलाव सुरू ठेवण्याचे प्रयत्न मागील दोन दिवस केले, परंतु अनेक व्यापारी खरेदीच करीत नसल्याची स्थिती आहे.

काही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून हमीपत्र लिहून घेऊन शेतमाल हमीभावापेक्षा कमी दरात खरेदीची सूट संचालकांनी व्यापाऱ्यांना दिली आहे. परंतु तरीही व्यापारी खरेदीस तयार नाहीत. जळगाव बाजार समितीमध्ये मागील दोन दिवस मुगाची प्रतिदिन ३० क्विंटल आवक झाली. परंतु मूग पडून आहे. पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ, चोपडा, यावल येथील बाजार समित्यांमध्येही अपवाद वगळता लिलाव सुरू नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजीपाला यार्ड सुरळीत :
जिल्हाभरातील भाजीपाला मार्केट यार्डात लिलाव सुरळीत सुरू आहे. धान्य मार्केट यार्डात व्यवहार सुरळीत करण्यासंबंधी संचालकांनी व्यापारी, अडतदारांसोबत बैठक घेतली. परंतु या बैठका निष्फळ ठरल्या आहेत. व्यापाऱ्यांनी शासनाचे लेखी पत्र हवे. तरच हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी होईल, असे स्पष्ट केले आहे.
जळगाव बाजार समितीमध्ये संचालकांनी राज्याच्या पणन मंडळाशी संपर्क साधून लिलाव ठप्प असल्याची माहिती दिली. तसेच हमीभावापेक्षा कमी दरात खरेदीसंबंधी कुठले पत्र, आदेश मिळेल का, जिल्हा उपनिबंधक यांना तशा सूचना देता येतील का? यासंबंधी प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आलेले नाही.

मुगाची आवक वाढली :
बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक वाढत आहे. उडदाची आवक चोपडा, भुसावळ भागात किरकोळ स्वरूपात सुरू आहे. जामनेर, पाचोरा येथेही लिलाव ठप्प असल्याने आवक जळगाव बाजार समितीत काही प्रमाणात झाली. परंतु लिलाव न झाल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल व्यापाऱ्यांकडे ठेवण्याची वेळ आली, अशी माहिती मिळाली.

सरकारच्या निर्णयाची भीती धुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये अडतदारांना आहे. तेथेही व्यवहार सुरळीत नाहीत. धुळे, शिंदखेडा व शिरपूर येथे मुगाच्या लिलावांवर परिणाम झाल्याची माहिती मिळाली आहे. तेथेही संचालक शासनाच्या प्रतिनिधींशी सतत संपर्कात असून, यासंबंधी तोडगा कसा निघेल, याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...