रेशन धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशिन केल्या परत

इ-पाॅस मशीन
इ-पाॅस मशीन

वडूज, जि. सातारा : रेशन घेण्यास आलेल्या ग्राहकांचे ठसे पॉस मशिनला लावूनही व्हेरिफाय होत नाहीत शिवाय नेटवर्कच्या अडचणींमुळे मशिन व्यवस्थितरीत्या काम करीत नसल्याने खटाव तालुक्‍यातील रेशन धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशिनच तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागाला परत केल्या. तालुक्‍यातील रेशन धान्य दुकानदारांची येथे बैठक झाली. त्यात रेशन धान्य दुकानदारांच्या अडचणींसंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, उपाध्यक्ष दिलीप घार्गे, सचिव प्रशांत शेटे, खजिनदार महेश इनामदार, सरचिटणीस मनोहर लावंड, आदी उपस्थित होते. दरम्यान, रेशन घेण्यासाठी आलेल्या काही ग्राहकांचे अंगठ्यांचे ठसे व्हेरिफाय होत नाहीत, शिवाय तालुक्‍यातील ग्रामीण भागांत असणाऱ्या गावांतील रेशन दुकानांतील इ पॉस मशिन इंटरनेटच्या नेटवर्क प्रॉब्लेममुळे अखंडितपणे कार्यरत राहत नसल्याने रेशन धान्य दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रेशन धान्य दुकानदारांनी या इ-पॉस मशिन आज पुरवठा विभागात जमा केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com