बनावट कीटकनाशकांचा गोरखधंदा
गोपाल हागे
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

कमी दर्जाचा व कमी किमतीचे कीटकनाशक पॅकिंग करून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या लेबलखाली विक्री केली जात आहे. असे काम करणारी साखळीच तयार झाली आहे. अनेकांबाबत माहिती असूनही शासकीय यंत्रणांकडून कारवाई टाळली जाते, असेही बोलले जाते.

अकोला : कीटकनाशकाच्या फवारणीमुळे विदर्भात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला असून यात अकोला जिल्ह्यातील एका शेतमजुराचाही समावेश आहे. या घटनांमुळे कीटकनाशकांचा विषय ऐरणीवर आला असून शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

पश्‍चिम विदर्भात अकोला ही कीडनाशकांची प्रमुख बाजारपेठ असून या ठिकाणी बनावट कीटकनाशक निर्मिती तसेच परवाना नसतानाही औषधांची विक्री करण्याच्या घटना वारंवार होत आहेत. हे प्रकार थांबविण्यात शासनाची यंत्रणा अत्यंत तोकडी ठरत आलेली आहे. खरिपात प्रामुख्याने तणनाशकासह हिरवी अळी, उंट अळी, गुलाबी बोंड अळी आदी किडींना प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक शेतकरी दोन ते चार फवारण्या करीत असतो.

कापूस उत्पादकांच्या फवारण्यांची संख्या तर सहा ते सात राहते. हजारो हेक्‍टरवरील फवारण्यांमुळे कीटकनाशकांची ही बाजारपेठ कोट्यवधींवर पोचली आहे. यावर्षी कमी पावसामुळे या बाजाराला फटका बसला तरी उलाढाल मात्र झाली आहे. असंख्य शेतकरी आजही कृषी विक्रेता सांगेल व देईल ती औषधी फवारणी करीत असतात. यामुळे गेल्या काही वर्षांत कीटकनाशकांमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

ब्रॅंडेड कंपन्यांच्या लेबलखाली विक्री
काहींनी मागणी असलेल्या कीडनाशकांची "सेम-टू-सेम" पॅकिंग करून विक्री करीत असल्याचा गोरखधंदा सुरू आहे. यावर्षात अकोल्यात असे दोन ते तीन प्रकार चर्चेत आले. तर काही ठिकाणी झालेल्या कारवायांमध्ये विक्रेत्यांकडे परवानगी नसतानाही विशिष्ट कीटकनाशकांचा साठा केल्याचा प्रकार उघडकीस आला.

कमी दर्जाचा व कमी किमतीचे कीटकनाशक पॅकिंग करून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या लेबलखाली विक्री केली जात आहे. असे काम करणारी साखळीच तयार झाली आहे. अनेकांबाबत माहिती असूनही शासकीय यंत्रणांकडून कारवाई टाळली जाते, असेही बोलले जाते.

यंत्रणा सुस्तच
कीटकनाशकांच्या फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू ओढवत असताना शासकीय यंत्रणा अद्यापही जाग्या झालेल्या नाहीत. या घटनांमुळे बदनामी होत असल्याने आता जनजागृतीचे पत्रक प्रसिद्धीला पाठवून, सोशल मीडियावर वितरीत केले जात आहे. प्रत्यक्षात फारशी कारवाई होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

इतर अॅग्रो विशेष
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारकपुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा...
मसाला उद्याेगातून भारतीताईंनी साधला ’...काळा मसाल्यासोबत शेंगा, कारळा, जवस चटण्यांचे...
गोसंवर्धन, प्रशिक्षण हेच 'गोकुलम...नांदुरा बुद्रुक (जि. अमरावती) येथील गोकुलम...
ज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे....
यवतमाळ जिल्ह्यात शेतमजुरांची होणार...मुंबई : कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे अनेकांचा...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः काेकण, गाेवा, मध्य महाराष्‍ट्र व...
आधुनिक बैलगाडीमुळे होईल बैलांवरील ताण...उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संशोधक डॉ. जयदीप...
कडधान्यांच्या अायातीत वाढ !मुंबई ः कडधान्यांच्या अायातीवर केंद्र सरकारने...
बहाद्दर शेतकऱ्यांचा होणार गौरव पुणे - प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश...
खतांवरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक... नवी दिल्ली ः खतांवरील अनुदान लाभार्थी...
मंगळवारपर्यंत पावसाची शक्‍यता, त्यानंतर...सर्व हवामान स्थिती पाहता ता. १४ ऑक्‍टोबर रोजी...
फवारणीसाठी चार हजार गावांमध्ये संरक्षण...नगर : यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेमुळे झालेल्या...
पावसाळी परिस्थितीत द्राक्ष बागेचे...सध्या काही ठिकाणी द्राक्ष बागेत आगाप छाटणी झालेली...
चवळी, मारवेल, स्टायलाे चारा लागवड...चवळी :  चवळी हे द्विदल वर्गातील...
मूग, उडीद खरेदी केंद्र उद्घाटनाच्या...अकोला : शासन अादेशानुसार नोंदणी केलेल्या...
कृषी सल्ला : पिकांचे नियोजन, कीड व रोग...सद्य परिस्थितीमध्ये पिकांच्या नियोजन व कीड व...
आॅनलाइन नोंदणी अडकली नियमातकोल्हापूर : हमीभाव खरेदी केंद्राबरोबरच अन्य...