agriculture news in Marathi, Fall Armyworm may threaten food security, Maharashtra | Agrowon

लष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोका
वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

आशियातील मका आणि भात पिकांवर लष्करी अळीचा विनाशकारी प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. किडीमुळे ही पीके धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे मका आणि भात पिकांचे उत्पादन घेऊन त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम हीईल.
- कुन्धवी काडीरेसन, सहायक महासंचालक, आशिया, ‘एफएओ’
 

युरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आशिया खंडात मोठ्या प्रणात वाढत आहे. या आक्रमक किडीचा अन्नधान्य पिकांसह ८० प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजातींवर जास्त प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे आशिया खंडातील लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांची अन्नसुरक्षा आणि जीवनमान धोक्यात आले आहे, असा इशारा अन्न व कृषी संघटनाने (एफएओ) दिला आहे. 

 आफ्रिका खंडात लष्करी अळीने कहर केला होता. त्यानंतर आशिया खंडात ही अळी प्रथम भारतात अाढळली. तिचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून, अाग्नेय आशिया आणि दक्षिण चीन या भागात जास्त धोका निर्माण झाला आहे, असे ‘एफएओ’ने म्हटले आहे.

‘एफएओ’च्या आशिया भागाच्या सहायक महासंचालक कुन्धवी काडीरेसन म्हणाल्या, की आशियात मका आणि भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम या उत्पादनावर अवलंबून असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांवर होणार आहे. ही कीड जगाच्या पूर्व भागातून हळूहळू पुढे सरकत आहे. आपल्याला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आशिया खंडात ८० टक्के अल्पभूधारक शेतकरी शेती करतात. त्यांच्याकडे जमिनीचा आकार लहान आहे. हे शेतकरी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी जवळपास २० हजार हेक्टरवर भात आणि मक्याचे पीक घेतात.

चीन हा जगातील मका उत्पादकात दोन नंबरचा देश आहे. आशिया पॅसिफिक देशांमध्ये जागातील ९० टक्के भाताचे उत्पादन आणि उपभोग घेतला जातो. ‘एफएओ’ने आफ्रिकेत ज्या भागात लष्करी अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत आणि कीड नियंत्रणासाठी मदत केली आहे. मका, भात, भाजीपाला, भुईमूग आणि कापूस यासह अनेक पिकांना फस्त करणाऱ्या कीड विरोधात लढा देण्यासाठी ‘एफएओ’ने ३० प्रकल्पांना मदत केली आहे.  

वेगाने प्रसार
एका रात्रीत १०० किलोमीटरपर्यंत उडणारे लष्करी अळीचे पतंग वर्षभरात सर्व पीक फस्त करू शकतात. लष्करी अळी सर्वप्रथम जानेवारी २०१६ मध्ये नायजेरिया देशात आढळली. त्यानंतर दोन वर्षांच्या काळातच १० पूर्व देश वगळता अर्ध सहारा आफ्रिकेमध्ये लष्करी अळीचा प्रसार झाला. प्रादुर्भाव झालेल्या भागात ‘एफएओ’ कीडनियंत्रण आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाईसाठी मदत दिली आहे. 

इतर अॅग्रो विशेष
राजगुरुनगरचा आदर्शराजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाला...
पीक कर्जवाटपाचा मुहूर्त टळणार?या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आल्याने आणि मे...
फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी जिंतूर, जि. परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या...
सिन्नर तालुक्यात दुष्काळाने डाळिंब...नाशिक  : पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर...
विदर्भात उष्णतेची लाटपुणे ः मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य...
शेडनेटगृह अनुदानाचे राज्यस्तरीय दरपत्रक...पुणे : धोरणात्मक कामकाजापासून शेतकरी प्रतिनिधींना...
स्ट्राॅबेरीची बाजारपेठ होतेय अधिक सक्षम महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...