agriculture news in Marathi, fall in minimum temperature in a state, Maharashtra | Agrowon

नाशिकमध्ये सर्वांत कमी तापमानाची नोंद
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पुणे ः राज्यात किमान तापमानात घट होत असून, थंडीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. रविवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिकमध्ये सर्वांत कमी म्हणजेच १३.८ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे ः राज्यात किमान तापमानात घट होत असून, थंडीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. रविवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिकमध्ये सर्वांत कमी म्हणजेच १३.८ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याचे चक्राकार वाऱ्यामध्ये रूपांतर होऊन हे वारे बंगालच्या उपसागराकडून श्रीलंका, तमिळनाडू आणि केरळच्या दिशेने सरकत आहे. तसेच केरळ आणि लक्षद्वीपकडून चक्राकार वारे कर्नाटकाच्या दिशेने सरकत आहे. तर कोकणाच्या दक्षिण भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा असून, त्याचे चक्राकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे. मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पडला. पुणे परिसरातही शनिवार (ता.४) पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहील.

सध्या राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ- उतार होत आहे. कोकण, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. सांताक्रूझमध्ये कमाल तापमानात सरासरीच्या ३५.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली. त्यापाठोपाठ विदर्भातील अकोला येथे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत २.५ अंश सेल्सिअसने घट होऊन ३५.१ अंश सेल्सिअस तापमान होते.

परभणीतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २.८ अंशांने घट होऊन १५.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली. तर जळगाव, नाशिक, सोलापूर, नागपूर, अकोला येथील तापमानातही घट झाली.

कोल्हापुरातील किमान तापमानात तीन अंशाने वाढ होऊन किमान तापमान २२.६ अंश सेल्सिअस होते. पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा, सांगली, मालेगाव येथील किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंशांनी वाढ झाली.

रविवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यंतचे कमाल, कंसात किमान तापमान ः (अंशसेल्सिअस) : मुंबई ३३.५ (२५.०), सांताक्रूझ ३५.६ (२२.७), अलिबाग ३२.९ (२२.८), रत्नागिरी ३४.८ (२४.६), डहाणू ३३.० (२१.०), पुणे ३१.१ (१८.०), नगर ३५.५, जळगाव ३४.० (१४.४), कोल्हापूर ३०.२ (२२.६), महाबळेश्वर २५.९ (१६.४), मालेगाव ३२.२, नाशिक ३१.४ (१३.८), सांगली ३२.० (२१.०), सातारा ३०.६ (१९.७), सोलापूर ३४.१ (१८.८), उस्माबाद ३०.३ (१५.४), औरंगाबाद ३३.४ (१६.०), परभणी ३३.८ (१५.९), नांदेड ३४.५ (१८.०), अकोला ३५.१ (१७.५),
अमरावती ३१.६ (१७.४), बुलडाणा ३१.५ (१७.४), ब्रह्मपुरी ३४.२ (१८.३), चंद्रपूर ३१.८ (२१.०), गोंदिया ३२.२ (१७.३), नागपूर ३३.३ (१७.०), वर्धा ३२.५ (१७.५), यवतमाळ ३२.५ (१६.०)

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...