agriculture news in marathi, family members of Women employee Interference in departmental work | Agrowon

महिला कर्मचाऱ्यांऐवजी कुटुबीयांचाच हस्तक्षेप !
विनोद इंगोले
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

अमरावती : सरपंच पतीप्रमाणे कृषी विभागातदेखील महिला कर्मचाऱ्यांच्या पतींचा कार्यालयीन कामात हस्तक्षेप वाढल्याने त्यावर नियंत्रणासाठी थेट प्रशासकीय कारवाईचेच आदेश कृषी सहसंचालकांना काढावे लागले. अकोट येथे कृषी सहायक महिलेचा पती लाचखोरीत पकडल्यानंतर हे आदेश काढण्यात आले. 

अमरावती : सरपंच पतीप्रमाणे कृषी विभागातदेखील महिला कर्मचाऱ्यांच्या पतींचा कार्यालयीन कामात हस्तक्षेप वाढल्याने त्यावर नियंत्रणासाठी थेट प्रशासकीय कारवाईचेच आदेश कृषी सहसंचालकांना काढावे लागले. अकोट येथे कृषी सहायक महिलेचा पती लाचखोरीत पकडल्यानंतर हे आदेश काढण्यात आले. 

जलयुक्‍त शिवारच्या कंत्राटदाराची देयक काढण्यासाठी एक लाख १८ हजार रुपयांची लाच घेण्यात आली होती. याप्रकरणी अकोट (जि. अकोला) येथील तालुका कृषी अधिकारी मंगेश ठाकरे, कृषी सहायक वनमाला भास्कर तसेच वनमालाचा पती सुरत्ने या तिघांना अटक करण्यात आली. कृषी सहायक महिलेच्या पतीमार्फत हा पैशाचा व्यवहार झाला. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या पतीचा कार्यालयीन कामात हस्तक्षेप वाढीस लागल्याची बाब चव्हाट्यावर आली. त्याची दखल घेत अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी कृषी विभागाच्या कामात महिला कर्मचाऱ्यांचे पती किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा हस्तक्षेप झाल्यास संबंधित महिला कर्मचाऱ्यावर तीव्र प्रशासकीय कारवाईचे आदेश दिले आहेत.  

महिला कृषी सहायकांनीदेखील नियमाप्रमाणे नेमणूक दिलेल्या मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. ग्रामस्तरावर त्यांच्याद्वारे कृषी योजनांविषयी मार्गदर्शनही अपेक्षित आहे. परंतु, तसे न करता त्यांच्याऐवजी त्यांचे पती किंवा कुटुंबातील इतर सदस्यच हे काम करीत असल्याची बाब निदर्शनास आल्याचे या आदेशात म्हटले आहे. यापुढे महिला कर्मचाऱ्यांचे कुटुंबातील प्रतिनिधी शासकीय योजना राबविताना आढळल्यास तत्काळ पर्यवेक्षकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) निम १९७९ अन्वये शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचा इशाराही विभागीय कृषी सहसंचालकांनी आदेशातून दिला आहे. 

चार महिलांची झाली तक्रार
विभागीय कृषी सहसंचालकांनी महिला कर्मचाऱ्यांसंदर्भाने कारवाईचा आदेश काढल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच चार तक्रारी कृषी सहसंचालक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या. महिला कर्मचाऱ्यांऐवजी त्यांचे पती किंवा कुटुंबीयच कृषी विभागाच्या दैनंदिन कामात हस्तक्षेप करीत असल्याचे यात म्हटले आहे. विशेष म्हणजे संबंधित कार्यालयाच्या प्रमुखांकडूनच या तक्रारी करण्यात आल्या असून त्याची चौकशीदेखील विभागीय कृषी सहसंचालकस्तरावरून होत आहे. चौकशीअंती या चारही प्रकरणात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. विभागीय कृषी सहसंचालकांनी घेतलेल्या या पुढाकाराचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत होत आहे.

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...