नवी दिल्ली ः पीक देखरेख अाणि अाणि नैसर्गिक अापत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार अाहे. त्यासाठी कृषी मंत्रालयाने सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या वापरासाठी राष्ट्रीय कार्यक्रम अाखला अाहे, अशी माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी लोकसभेत दिली अाहे.
कृषी व्यवस्थापन, पिकाची देखरेख अाणि मॅपिंगचा सॅटेलाइट तंत्रज्ञान कार्यक्रमात समावेश करण्यात अाला अाहे. तसेच या कार्यक्रमात पीक मूल्यांकन, अापत्तीचा धोका कमी करणे, उपग्रह संपर्क अादींचाही समावेश असेल, असे कृषी राज्यमंत्री शेखावत यांनी स्पष्ट केले अाहे.
पीक अंदाज, दुष्काळ मूल्यांकन, फलोत्पादन विकास अाणि मूल्यांकन, पीक विमा, पीक तीव्रता नियोजनासाठीही सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना दर्जेदार अाणि प्रमाणित बियाणे उपलब्ध व्हावीत यासाठी पंचायत स्तरावर ५०० बियाणे उत्पादन अाणि प्रक्रिया केंद्रे उभारली जाणार अाहेत, अशीही माहिती त्यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावेळी दिली अाहे.