agriculture news in marathi, farm pond scheme status,akola, maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यात १०३२ शेततळ्यांची कामे पूर्ण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 एप्रिल 2018
अकोला ः पीकउत्पादन वाढीसाठी शाश्वत पाणीस्रोत तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त ठरते. हे ध्यानात घेत ‘मागेल त्याला शेततळे’ योजना सुरू करण्यात अाली. जिल्ह्याला असलेला साडेतीन हजार शेततळ्यांचा लक्ष्यांक आतापर्यंत केवळ ३० ते ३५ टक्के पूर्ण झाला अाहे. या योजनेतून १०३२ शेततळ्यांची कामे पूर्ण झाल्याची माहिती समोर अाली अाहे. 
  
अकोला ः पीकउत्पादन वाढीसाठी शाश्वत पाणीस्रोत तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त ठरते. हे ध्यानात घेत ‘मागेल त्याला शेततळे’ योजना सुरू करण्यात अाली. जिल्ह्याला असलेला साडेतीन हजार शेततळ्यांचा लक्ष्यांक आतापर्यंत केवळ ३० ते ३५ टक्के पूर्ण झाला अाहे. या योजनेतून १०३२ शेततळ्यांची कामे पूर्ण झाल्याची माहिती समोर अाली अाहे. 
  
टंचाईग्रस्त भागात ही योजना प्रामुख्याने राबवली जाते. योजनेअंतर्गत  ३० बाय ३० बाय ३ मीटर अाणि १५ बाय १५ बाय ३ मीटर आकारमानाचे शेततळे दिले जाते. ३० बाय ३० बाय ३ मीटर शेततळ्यासाठी ५० हजार रुपये अनुदान दिले जाते, तर इतर खर्च शेतकऱ्यांनी करायचा अाहे. शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज अाॅनलाइन पद्धतीने मागवण्यात अाले. 
 
जिल्ह्याला ३५०० शेततळ्यांचा लक्ष्यांक होता. मात्र यासाठी ४६९२ अर्ज अाले होते. त्यापैकी ३३९० अर्ज पात्र ठरले. तालुकास्तरीय समितीने ३३४८ अर्जांना मंजुरी दिली. त्यानंतर २९६२ शेततळ्यांना कार्यारंभ अादेश देण्यात अाले. अद्याप पर्यंत १०३२ शेततळी पूर्ण झाली आहेत. १६८ शेततळ्यांची कामे सुरू अाहेत.
 
शासन देत असलेल्या अनुदानात शेततळे खोदणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांचा फारसा उत्साह राहलेला नाही. यंत्रणांना सातत्याने पाठपुरावा करून कामे पुर्णत्वास न्यावी लागत अाहेत. अनुदान कमी पडत असल्याने तसेच शेतकऱ्यांना खोदकामाबाबत तितकीशी माहिती नसल्याचा समज करून घेत काही ठिकाणी शेततळ्याचा अाकार कमी करून खोदले जात अाहे. ३० बाय ३० बाय ३ मीटर एेवजी २५ बाय २५ बाय ३ मीटर अाकाराचे शेततळे खोदले जात असून, देयक मात्र पूर्ण अाकाराच्या शेततळ्याचे काढले जात असल्याची चर्चा कृषी यंत्रणेत एेकायला मिळते, अशी कामे करणारी यंत्रणा खालपासून वरपर्यंत सर्व मॅनेज करीत असल्याचेही बोलले जाते. 

इतर ताज्या घडामोडी
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...