agriculture news in marathi, farm pond scheme status,amravati, maharashtra | Agrowon

अमरावती जिल्ह्यात नऊ आठवड्यात शेततळ्यांची ६४२ कामे पूर्णत्वास
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 मार्च 2018
अमरावती ः खारपाणपट्ट्यासह जिल्ह्यात शाश्‍वत सिंचनाची सोय व्हावी, या उद्देशाने मागेल त्याला शेततळे योजनेच्या अंमलबजावणीला कृषी विभागाकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यातंर्गत अवघ्या ९ आठवड्यांत जिल्ह्यात शेततळ्याची ६४२ कामे पूर्णत्वास गेली आहेत. 
 
अमरावती ः खारपाणपट्ट्यासह जिल्ह्यात शाश्‍वत सिंचनाची सोय व्हावी, या उद्देशाने मागेल त्याला शेततळे योजनेच्या अंमलबजावणीला कृषी विभागाकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यातंर्गत अवघ्या ९ आठवड्यांत जिल्ह्यात शेततळ्याची ६४२ कामे पूर्णत्वास गेली आहेत. 
 
जिल्ह्याला ४५०० शेततळ्यांचे उद्दीष्ट आहे. यापैकी कृषी विभागाने २४३५ शेततळ्यांचे काम पूर्ण केले आहे. दारिद्रयरेषेखालील शेतकरी व ज्या कुटुंबात आत्महत्या झाली आहे, त्यांच्या वारसांना निवडप्रक्रियेतील ज्येष्ठता यादीत सूट देऊन प्राधान्याने त्यांची निवड योजनेसाठी केली जाते. शेततळी मागणी करणाऱ्या इतर सर्व संवर्गातील शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्त्वावर निवड केली जाते.
 
या योजनेसाठी शेतकऱ्याच्या नावावर किमान ०.६० हेक्‍टर जमीन असणे आवश्‍यक आहे. शेततळ्यासाठी कृषी विभागाकडून किमान २६ हजार रुपये तर कमाल ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. खारपाणपट्ट्यातील भातकुली तालुक्‍यात सर्वाधिक दोन हजार तर दर्यापूर तालुक्‍याला १२०० शेततळ्यांचा लक्षांक आहे.
 
जिल्ह्यात दोन वर्षांपासून ही योजना राबविली जात आहे.
तेव्हापासून आतापर्यंत सर्वाधिक १०९५ शेततळी भातकुली तालुक्‍यात झाली आहेत. त्यापाठोपाठ अंजनगावसूर्जी येथे २१७, अमरावती येथे १०८, चांदूरबाजार येथे १०५, अचलपूर येथे १३३ याप्रमाणे शेततळ्यांचे काम झाले आहे. सद्यःस्थितीत २७० शेततळ्यांचे काम सुरू आहे. योजनेअंतर्गंत आतापर्यंत १८०२ शेतकऱ्यांना ७ कोटी ९२ लाख ५५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.
 
खारपाणपट्ट्यात सिंचनाची शाश्‍वत सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्याच्या प्रयत्नाअंतर्गंत या भागात शेततळ्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून पुढाकार घेतला जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...