मराठवाड्यात शेततळ्यांचे पूर्णत्‍व निम्म्यापेक्षाही कमी

शेततळ्यांचे पूर्णत्‍व निम्म्यापेक्षाही कमी
शेततळ्यांचे पूर्णत्‍व निम्म्यापेक्षाही कमी

औरंगाबाद : मराठवाड्यात उद्दीष्टाच्या तुलनेत प्राप्त अर्जांमधून ५५ हजार ८४३ शेततळ्यांच्या अर्जांना कार्यारंभ आदेश देण्यात आले होते, मात्र त्या तुलनेत २० फेब्रुवारी अखेरपर्यंत निम्म्यापेक्षा कमी म्हणजे २२ हजार ७३० शेततळ्यांचीच कामे पूर्ण झाली आहेत.  यंदा मराठवाड्यात ३९ हजार ६०० शेततळ्यांची कामे करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र, या तुलनेत ८५ हजार २२ अर्ज शेततळ्यांसाठी प्राप्त झाले. त्यापैकी ६४ हजार ३४४ अर्ज स्वीकारण्यात आले, यातील ५५ हजार ८४३ अर्जदार शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. यापैकी ५१ हजार ३४८ शेततळ्यांची आखणी करून देण्यात आली. मात्र, यानंतरही निम्म्यापेक्षा कमी म्हणजे २२ हजार ७३० शेततळ्यांचीच कामे पूर्ण झाली आहेत. फेब्रुवारी ते मार्च अखेरपर्यंत शेतीपिकांचा हंगाम संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेततळ्यांची कामे पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. जवळपास महिनाभराचा कालावधी शिल्लक असल्याने उद्दीष्टाची पूर्ती होते किंवा नाही हा प्रश्नही उपस्थित होत आहे. 

१८५३ शेततळ्यांचे अनुदान बाकी मंजुरी मिळालेल्या २२ हजार ७३० पैकी २० फेब्रुवारीपर्यंत कामे पूर्ण झालेल्या २० हजार ८७७ शेततळ्यांचे अनुदान देण्यात आले, असून १८५३ शेततळ्यांचे अनुदान बाकी आहे. यात सर्वाधिक बीड जिल्ह्यातील ६९१ शेतळ्यांचे अनुदान देणे बाकी असून या पाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यात २०९, जालना जिल्ह्यात २१३, उस्मानाबाद जिल्ह्यातील ४९३, नांदेड जिल्ह्यातील ६३, परभणी जिल्ह्यातील ८३ तर हिंगोली जिल्ह्यातील १०१ शेततळ्यांची कामे पूर्ण होऊनही अनुदान मिळालेले नाही. लातूर जिल्ह्यात एकाही शेततळ्यांचे अनुदान बाकी नसल्याची स्थिती आहे. 

शेततळ्यांचे कार्यारंभ आदेश, आखणी व प्रत्यक्ष कामे (सुरू व पूर्ण)
जिल्हा कार्यारंभ आदेश आखणी संख्या सुरू पूर्ण
औरंगाबाद १२९८२ ११३७० १९२ ६३४५
जालना ११००७ ९३४३ १५३ ४९६०
बीड ७९०३ ७८४७ ३२६ ३७५४
लातूर ५७१२ ५७६७ ५० १४८८
उस्मानाबाद ६८७० ६८७० १२० २२२४
नांदेड ५१२७ ५०७७ ११२ १२८६
परभणी ३५८४ २८७६ ३२ १३६७
हिंगोली २६५८ २२८९ १५३ १३०६
जिल्हानिहाय अनुदान मिळालेल्या शेततळ्यांची संख्या
औरंगाबाद ६१३६
जालना ४७४७
बीड ३०६३
लातूर १४८८
उस्मानाबाद १७३१
नांदेड १२२३
परभणी १२८४
हिंगोली १२०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com