पुण्यात दिवाळीच्या तोंडावर शेतमालाचे दर स्थिर

पुण्यात दिवाळीच्या तोंडावर शेतमालाचे दर स्थिर
पुण्यात दिवाळीच्या तोंडावर शेतमालाचे दर स्थिर

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ४) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत वाढ झाली होती. दर दिवाळीच्या तोंडावर शेतमालाची मागणी तुलनेने घटल्याने दर स्थिर होते.

परराज्यातून हाेणाऱ्या आवकेमध्ये राजस्थानातून गाजर सुमारे ४ ट्रक, हिमाचलप्रदेशातून २ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ४ ट्रक कोबी, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, बंगळूर येथून आले २ टेम्पो आले, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ टेम्पो शेवगा, गुजरात येथून भूईमूग सुमारे १ ट्रक, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली हाेती.

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० पोती, टॉमेटोे सुमारे ५ हजार क्रेट, काेबी १२ तर फ्लॉवर १५ टेम्पाे, गवार ५, भेंडी ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची १२ टेम्पो, हिरवी मिरची ५ टेम्पो, भूईमूग शेंग ५० गोणी, नवीन आणि जुना कांदा सुमारे ८० ट्रक आणि आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून बटाटा सुमारे ५० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव कांदा : १००-१६०, बटाटा : १४०-२३०, लसूण : १५०-२५०, आले : सातारी : ५५०-६५०, भेंडी : ३००-४०० गवार : सुरती- ४००-५००, टोमॅटो : ४०-६०, दोडका : २५०-३०० हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : १२०-१६०, कारली : हिरवी १४०-१८०, पांढरी : १००-१२०, पापडी : २५०-३००, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ४०-८०, वांगी : २००-४०० डिंगरी : १८०-२००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १००-१४०, तोंडली : कळी २००-२२०, जाड : ९०-१००, शेवगा : ४००-५००, गाजर : स्थानिक ८०-१२०, राजस्थान २००-२५०, वालवर : २५०-३००, बीट : ८०-१२०, घेवडा : २५०-३००, कोहळा : १५०-२००, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १६०-१८०, ढेमसे : ३००-३५०, भूईमूग : ५००-५५०, पावटा : ६००-७००, मटार : ८००- ९००, तांबडा भोपळा : ६०-१००, सूरण : २२०-२४०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे सव्वा लाख तर मेथी अवघी सुमारे ७० हजार जुड्या आवक झाली हाेती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) कोथिंबीर : ५००-९००, मेथी : ५००-१०००, शेपू : १०००-१३००, कांदापात : ५००-८०० चाकवत : ५००-८००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ६००-८००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ५००-७००, चुका : ५००-८००, चवळई : ५००-८००, पालक : ८००-१०००.

फळबाजार फळबाजारात रविवारी (ता. ४) मोसंबी सुमारे १०० टन, संत्री २५ टन, डाळिंब २०० ते २५० टन, पपई २५ ते ३० टेम्पोे, लिंबे सुमारे ४ हजार गोणी, चिक्कू २ हजार बॉक्स आणि गोणी, पेरू ६०० क्रेटस्, कलिंगड १५ ते २० टेम्पो, खरबूज १० ते १२ टेम्पो, सफरचंद ५ ते ६ हजार पेटी, विविध जातींची बोरे सुमारे ७०० गोणी, सीताफळ सुमारे ७ टन आवक झाली होती.

फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : २००-६००, मोसंबी : (३ डझन) : १२०-२५०, (४ डझन ) : ४०-१२०, संत्रा : ( ३ डझन) १००-२२०, (४ डझन) : ३०-१००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ३०-१२०, गणेश १०-३०, आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-१६, खरबूज : १०-२०, पपई  : ५-१५, चिक्कू : १००-४००, पेरू (२० किलो) : ३००-५००, सीताफळ : २०-१५०, सिमला (२५ किलो) १२००-१८००, किन्नोर : (२५ ते २६ किलो) २३००-३०००, काश्मीर डेलीशिअस : (१५ ते १६ किलो) ७००-१३००, बोरे : चेकनट (१० किलो) ४२०-५००, उमराण (१० किलो) ७०-९०, चमेली (१० किलो)  १५०-१८०, चण्यामण्या ३५०-४५०.

फुलबाजार फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-६०, गुलछडी : ८०-१५०, बिजली : ४०-७०, कापरी : २०-६०, शेवंती ३०-१००, ऑस्टर : १८-२०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : १६-२५, गुलछडी काडी : १००-१४०, डच गुलाब (२० नग) : ७०-९०, लिलिबंडल : ८-१२, जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : १००-१८०, चमेली : ४००-६००.

मासळी गणेश पेठ येथील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळीची सुमारे ८  टन, नदी आणि खाडीची प्रत्येकी सुमारे ८०० किलो, तर आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे ६ टन आवक झाली होती. खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे : १४००-१५००, मध्यम : ८००, लहान : ५५०-६००, भिला : ४००-४८०, हलवा : ४४०-४८०, सुरमई : ४००-४८०, रावस-लहान : ४४०-४८०, मोठे ६००-६५०, घोळ : ५५०, करली : २४०-२८०, करंदी  (सोललेली) : २८०,  भिंग : २४०, पाला : लहान ६००-७०० , मोठे :१२००, वाम : पिवळी ५५०, काळी : ३६०, ओले बोंबील : लहान ६०, म १००- १४०.

कोळंबी ः लहान : ३६०-४००, मोठी : ४८०-५५०, जंबोप्रॉन्स :१४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर :१४००, मोरी : २४०, मांदेली : १००-१२० राणीमासा : १६०, खेकडे : २००, चिंबोर्या : ४००-४८०. खाडीची मासळी : सौंदाळे : २००, खापी : १६०-२००, नगली : लहान २८० मोठी ४८०-५५०, तांबोशी : ४०० , पालू : २००, लेपा : लहान १४०, मोठे २००, शेवटे : २४० बांगडा : लहान १४०-१६० मोठा २००-२४०, पेडवी : ५०, बेळुंजी : १००-१४०, तिसऱ्या : १६०, तारली : १००-१२०. नदीची मासळी : रहू : १४०-१६०, कतला : १६०-१८०, मरळ : लहान २४०-२८०, मोठी ३६०-४००, शिवडा : १६० चिलापी : ४०-६०, मागुर : ११०-१२०, खवली : १६०, आम्ळी : ८० खेकडे : १६०, वाम : ४००-४८०.

मटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०. चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. अंडी : गावरान : शेकडा : ७२०, डझन : ९६ प्रतिनग : ८. इंग्लिश : शेकडा : ४४४  डझन : ६० प्रतिनग : ५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com