agriculture news in marathi, farm visit should be prefer: Agriculture Commissioner | Agrowon

कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिवारभेटी द्याव्यात : कृषी आयुक्‍त
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 जानेवारी 2018

नागपूर : कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शिवार भेटी कमी झाल्या आहेत. त्यातूनच शेतकऱ्यांशी थेट संवाद होत नसल्याने ही दरी वाढती राहिली आणि कृषी क्षेत्रासमोर नवनवीन आव्हाने उभी झाली. त्यावर पर्याय म्हणून कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केबिनबाहेर पडत शिवारभेटींना प्राधान्य दिले पाहिजे, असा सल्ला कृषी आयुक्‍त सचिंद्र प्रतापसिंह यांनी दिला.

नागपूर : कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शिवार भेटी कमी झाल्या आहेत. त्यातूनच शेतकऱ्यांशी थेट संवाद होत नसल्याने ही दरी वाढती राहिली आणि कृषी क्षेत्रासमोर नवनवीन आव्हाने उभी झाली. त्यावर पर्याय म्हणून कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केबिनबाहेर पडत शिवारभेटींना प्राधान्य दिले पाहिजे, असा सल्ला कृषी आयुक्‍त सचिंद्र प्रतापसिंह यांनी दिला.

वनामती येथे सोमवारी (ता.८) आयुक्‍त सिंग यांनी नागपूर व अमरावती विभागाचा आढावा घेतला. या सर्व तालुक्‍यांतील जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी बैठकीला उपस्थित होते. शेतीसंदर्भातील समस्या जाणून घेण्याकरिता शिवारभेटीशिवाय पर्याय नाही, परंतु नजीकच्या काळात शेतकरी आणि कृषी कर्मचाऱ्यांमधील संवाद कमी झाला. त्यातूनच अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. शेतकऱ्यांशी अटॅचमेंट असेल तर त्यांच्याशी निगडित समस्या जाणता येतील आणि त्याचेवेळीच निदान करता येणे शक्‍य होणार आहे. विदर्भात अशाप्रकारच्या उपक्रमाची गरज असल्याने कर्मचाऱ्यांनी शेतशिवाराला भेटीसाठी प्राधान्य द्यावे, असा सल्ला कृषी आयुक्‍तांनी दिला.

बैठकीत झाडाझडती
अमरावती व नागपूर विभागाचा आढावा घेताना काही योजनांची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नसल्याबाबत कृषी आयुक्तांनी नाराजी व्यक्‍त केल्याचे सूत्रांनी सांगीतले. या वेळी त्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बैठकीतच झाडाझडती घेतली. कृषी यांत्रिकीकरणावर येत्या काळात भर देण्याचा सल्लाही दिला. त्याकरिता अतिरिक्‍त उद्दिष्ट निश्‍चित केले जाईल, असे आयुक्‍तांनी स्पष्ट केले. बैठकीदरम्यान वातावरण चांगलेच गंभीर झाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावरची चिंता वाढली होती.

इतर बातम्या
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...