कामगंध सापळ्यांचा सामूहिक वापर करा

कामगंध सापळ्यांचा सामूहिक वापर करा
कामगंध सापळ्यांचा सामूहिक वापर करा

औरंगाबाद : कामगंध सापळ्यांचा सामूहिक वापर केल्यास कपाशी पिकाचे होणारे नुकसान टाळता येणे शक्‍य असल्याचे मत कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. किशोर झाडे यांनी व्यक्‍त केले.

पैठण तालुक्‍यातील लाखेगाव येथे  गुरुवारी (ता. २) विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी या उपक्रमांतर्गत विशेष पीकसंरक्षण मोहिमेंतर्गत प्रक्षेत्र पाहणी व शेतकरी प्रशिक्षणात ते बोलत होते. या वेळी कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक प्रा. दीप्ती पाटगावकर, डॉ. अनिता जिंतूरकर, इरफान शेख यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी अंकुश राहटवाडे होते.

डॉ. झाडे म्हणाले, ‘‘गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहता शेतकऱ्यांनी एकरी किमान आठ कामगंध सापळे लावावेत. या सापळ्यांमध्ये लागोपाठ तीन दिवस आठ पतंग आढळल्यास उपाययोजना सुरू करावी. सूत्रसंचालन डॉ. अनिता जिंतूरकर यांनी केले. या वेळी कचरू घोडके यांच्या शेतावरही पाहणी करण्यात आली. या कार्यक्रमाला लाखेगाव, पाडोळी, वडगव्हाण, बन्नीतांडा, डोणगाव, पोरगाव आदी गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com