agriculture news in marathi, farmer in 2 lakhs rupees loss due to faulty onion seeds | Agrowon

सदोष बियाण्यामुळे दोन लाख रुपयांच्या कांद्याचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

सटाणा : पारनेर (ता.बागलाण) येथील शेतकरी जालिंदर देवरे यांच्या दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला सदोष बियाण्यामुळे टोंगळ आले आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊन दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून संबधित बियाणे कंपनीने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पिडीत शेतकरी देवरे यांनी मालेगाव येथील उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सटाणा : पारनेर (ता.बागलाण) येथील शेतकरी जालिंदर देवरे यांच्या दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला सदोष बियाण्यामुळे टोंगळ आले आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊन दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून संबधित बियाणे कंपनीने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पिडीत शेतकरी देवरे यांनी मालेगाव येथील उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात कांदा उत्पादक शेतकरी जालिंदर देवरे यांनी मालेगाव येथे उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली आणि लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीत, १५ सप्टेंबर २०१७ रोजी सटाणा येथील मे. यशवंत जी मोरे यांच्याकडून खासगी कंपनीचे कांदा बियाणे वाण खरेदी केले होते. त्यावेळी पाचशे ग्राम वजनाचे सात पाकिटे विकत घेतली होती. त्याची रोपं तयार करून ८ डिसेंबर २०१७ रोजी आपल्या दीड एकर क्षेत्रावरील शेतात कांद्याची लागवड केली होती. सुमारे साठ हजार रुपयांचे कांदा पिक उभे केले, मात्र त्याला सदोष बियाण्यामुळे अक्षरशः टोंगळ फुटले. त्यामुळे कांदा पिकाची वाढ खुंटून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

देवरे यांच्या तक्रारीची दखल घेत तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार, तालुका कृषी अधिकारी दिलीप कापडणीस, बियाणे महामंडळाचे डॉ.जे.के.ढेभरे, कृषी अधिकारी प्रणय हिरे यांनी प्रत्यक्ष पिकाची पाहणी केली.

दरम्यान, कंपनीच्या प्रतिनिधींनी पिकाची पाहणी करून ८० टक्के कांदा पिकाचे नुकसान झाल्याची कबुली दिल्याचा दावा पिडीत शेतकरी श्री.देवरे यांनी केला आहे. मात्र कंपनीने फक्त बियाण्याचा खर्च देऊ असे सांगून एकप्रकारे हात वर केल्याचे तक्रारीत देवरे यांनी नमूद केले आहे.

सदोष बियाणे विक्री करून कंपनीने एकप्रकारे माझी फसवणूक केली असून यामुळे माझे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आज कांद्याला असलेला भाव बघता बियाण्यांमुळे नुकसान झाल्याने मानसिक त्रास वाढला आहे. कृषी विभागाने त्या कंपनीवर कारवाई करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी जालिंदर देवरे यांनी केली. 

इतर ताज्या घडामोडी
सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकलासांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९०...
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी...नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार...औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील...
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवारनगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन...
सिंचनाच्या पाण्याचे मोजमाप करण्याच्या...शेतीमध्ये पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून,...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल १००० ते २५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मतदान केंद्रावरील रांगेपेक्षा...सोलापूर  : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र...
अवकाळीचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटकासोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-...
मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसानमंठा, जि. जालना  : तालुक्यात मंगळवारी ( ता....
पुणे विभागातील दोन लाख हेक्टरवरील ऊस...पुणे  ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पुणे...
मराठवाड्यातील मतदान टक्केवारीत किंचित घटबीड, परभणी : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद,...
सातारा जिल्‍ह्यातील ऊस उत्पादकांना...सातारा  ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा...
म्हैसाळ योजनेत २२ पंपांद्वारे उपसासांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांची संख्या विक्रमी...
दिग्गजांच्या सभांनी तापणार साताऱ्यातील...सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय...
प्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदारमुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ४००ते २०००...नाशिकला काकडी प्रतिक्विंटल १२५० ते १७५० रुपये...
धनगर समाज भाजपच्याच पाठीशी ः महादेव...सांगली  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच...
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...