मंत्रालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
मंत्रालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : सोयाबीन आणि कपाशीला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ आणि राज्य सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या मागणीसाठी ज्ञानेश्वर साळवे (रा. मसला खुर्द, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) या तरुण शेतकऱ्याने शुक्रवारी (ता. १०) मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला.

सुमारे दीड तास चाललेल्या या नाट्यामुळे मंत्रालयात एकच तारांबळ उडाली होती. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रणजित पाटील आणि दीपक केसरकर यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर तब्बल दीड तास चाललेल्या या नाट्यावर पडदा पडला.

मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीत सातव्या मजल्याच्या सज्जावर हा तरुण चढला होता. सायंकाळी चारच्या सुमारास ही बाब निदर्शनाला आली. त्यामुळे मंत्रालय परिसरात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्याला खाली उतरवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा कृषिमंत्री पाडुरंग फुंडकर यांच्याशीच बोलणार असल्याचे सांगून त्याने इतर कोणाशीही बोलण्यास नकार दिला. 

पाचच्या सुमाराला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे याठिकाणी आले. तावडे यांनी या तरुण शेतकऱ्याशी चर्चा करून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. सुमारे वीस मिनिटांच्या वाटाघाटीनंतर या तरुणाला सज्जावरून सुखरूप उतरवण्यात यश आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com