agriculture news in marathi, Farmer Attention to the declaration of drought | Agrowon

शेतकऱ्यांचे दुष्काळाच्या घोषणेकडे लक्ष
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा कमी पाऊसमान झाल्याने खरिप हंगाम वाया गेला. आता रब्बीही हातचा जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने केंद्र शासनाच्या नव्या निकषानुसार तालुकानिहाय दुष्काळाबाबत सत्यमापन अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पण त्याचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे परतलेल्या पावसानंतर आता शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या घोषणेकडे लागले आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा कमी पाऊसमान झाल्याने खरिप हंगाम वाया गेला. आता रब्बीही हातचा जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने केंद्र शासनाच्या नव्या निकषानुसार तालुकानिहाय दुष्काळाबाबत सत्यमापन अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पण त्याचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे परतलेल्या पावसानंतर आता शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या घोषणेकडे लागले आहे.

यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने पाठ फिरवली. आतापर्यंत १५० ते २०० मिलिमीटरच्याही पुढे पाऊस सरकला नाही. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०० मिलिमीटरपर्यंत आहे. यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत केवळ ४० टक्केपर्यंत पाऊस झाला. त्याशिवाय खरीप पिकांची स्थितीही समाधानकारक नाही. शासनाच्या निकषानुसार जिल्हा पात्र ठरत असताना जिल्हा प्रशासनाकडून तालुकानिहाय दुष्काळाबाबत सत्यमापन अहवाल मागविण्यात आला आहे. त्यानुसार तहसीलस्तरावर तहसीलदारांसह यंत्रणेकडून कामकाज सुरू आहे. थेट बांधावर जाऊन अधिकारी पाहणी करत आहेत. पण त्यात गती नाही. अद्यापपर्यंत एकाही तालुक्‍याचा प्रस्ताव प्राप्त झाला नाही. येत्या दोन दिवसांत जिल्ह्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येत असली, तरी कामात मात्र नुसती चालढकल सुरू आहे.

१५ ऑक्‍टोबरची मुदत
नियोजन समितीच्या बैठकीत १५ ऑक्‍टोबरपर्यंत शासनाला दुष्काळी स्थितीचा अहवाल सादर करणार, असे प्रशासनाने सांगितले होते. पण तालुकास्तरावरून अद्याप अहवाल प्राप्त न झाल्याने अहवाल सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे हा अहवाल कधी जाणार आणि दुष्काळ कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माहितीसाठी मोबाईल ॲप

कृषी आयुक्ताच्या आदेशानुसार तालुक्‍यातील १० टक्के गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्याकडून मोबाइल ॲपद्वारे माहिती संकलित केली जात आहे. अद्यापही अनेक तालुक्‍यांकडून माहिती संकलितच केली जात आहे. ठोस असे काम होऊ शकलेले नाही. पाणीटंचाईची स्थिती जाणून घेण्यासाठी नोव्हेंबर ते मे या कालावधीत पाणीटंचाई जाणवणारी संभाव्य गावे कोणती आहेत? याची तालुकानिहाय माहिती सादर करण्याचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनास सादर केले आहे. आठवडाभरात माहिती सादर करावी, असे आदेशामध्ये नमूद केले आहे. त्यातही फारशी सुधारणा नाही. तिथेही धिम्या गतीनेच काम सुरू आहे.

इतर अॅग्रो विशेष
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...