agriculture news in Marathi, Farmer companies will purchased Onion for Nafed, Maharashtra | Agrowon

शेतकरी कंपन्या करणार नाफेडसाठी कांदा खरेदी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 एप्रिल 2018

पुणे ः कांद्याचे घसरत चाललेले दर व बाजारात स्थिरता आणण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने नाफेडला महाराष्ट्रात २५,००० टन कांदा खरेदीला परवानगी दिलेली आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या वतीने महा-एफपीसीने १५,००० टन खरेदीचा प्रस्ताव नाफेडकडे पाठविला होता. याला नाफेडने हिरवा कंदील दिला असून, साधारणपणे एप्रिलच्या दुसऱ्या आठवडाभरात हे काम सुरू होणार आहे, अशी माहिती महा-एफपीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी दिली.

पुणे ः कांद्याचे घसरत चाललेले दर व बाजारात स्थिरता आणण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने नाफेडला महाराष्ट्रात २५,००० टन कांदा खरेदीला परवानगी दिलेली आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या वतीने महा-एफपीसीने १५,००० टन खरेदीचा प्रस्ताव नाफेडकडे पाठविला होता. याला नाफेडने हिरवा कंदील दिला असून, साधारणपणे एप्रिलच्या दुसऱ्या आठवडाभरात हे काम सुरू होणार आहे, अशी माहिती महा-एफपीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी दिली.

शेतकरी उत्पादक या थेट गावपातळीवर कांद्याची खरेदी करणार आहेत. ही खरेदी बाजारभावानुसार होईल. यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीच्या परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभाव पायाभूत मानण्यात येतील. बाजारभावाने थेट बांधावर खरेदी होणार असल्याने शेतकऱ्यांचा कांदा बाजारपेठेत नेण्याच्या खर्चाबरोबरच बाजारामधील इतर खर्चदेखील वाचणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे.

थेट शेतकरी सामुदायिक सुविधा केंद्रांकडे उपलब्ध असणाऱ्या चाळी किंवा भाडेतत्त्वावरील चाळी यामध्ये या कांद्याची साधारणपणे ३-६ महिन्यांसाठी साठवणूक होणार आहे. तसेच क्लस्टर स्तरावर एकत्रित ठिकाणी साठवणूक करण्यासाठी नाशिकमधील व्यापाऱ्यांच्या धर्तीवर ‘तात्पुरती साठवणूक व्यवस्था’ करण्याबाबत महाएफपीसीकडून चाचपणी सुरू आहे. खरेदी केलेला कांदा प्रामुख्याने दिल्लीमध्ये पाठविला जाणार आहे. कांदा खरेदीपासून त्याची साठवणूक करणे तसेच विक्रीसाठी बॅग भरण्याची जबाबदारी शेतकरी उत्पादक कंपनीची असणार आहे.

यासाठी महाएफपीसीच्या सभासद संस्थांबरोबरच कांदा पिकात काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी महाएफपीसीशी संपर्क साधावा. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या परिसरामधील शेतकरी उत्पादक कंपनीशी संपर्क साधावा.
(संपर्क ः अक्षय ९४०५४३१७१५)

इतर अॅग्रो विशेष
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...
सुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...
शेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...
निर्यात कोट्यावरून साखर उद्योगात घमासानपुणे : देशात साखरेचा अफाट साठा तयार होत असताना...
शेतकऱ्यांचा जीवनसंघर्ष २०१८ मध्येही...मुंबई : गेल्या चार वर्षांत सिंचन सोडून कृषीच्या...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या...
हवामान बदलांमुळे दारिद्र्य वाढण्याचा...नवी दिल्ली : हवामानबदलांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे...
हिमवृष्टीमुळे काश्‍मीर, हिमाचल गारठले;...नवी दिल्ली : हिमवृष्टीमुळे काश्‍मिरसह हिमाचल...
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...
विदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे   : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...