agriculture news in marathi, farmer company direction agitate in front of agri ministers house | Agrowon

शेतकरी कंपन्यांच्या संचालकांचा आत्मदहनाचा प्रयत्न
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 एप्रिल 2018

अकोला : शेतकरी कंपन्यांचे बीजोत्पादन व वितरणाचे थकलेले अनुदान देण्यास शासनाने नकार दिल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कंपन्यांच्या संचालकांनी शनिवारी (ता.३१) कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिस प्रशासनाची एकच दमछाक झाली. या वेळी पोलिसांनी एकूण ११ जणांना ताब्यात घेतले. 

अकोला : शेतकरी कंपन्यांचे बीजोत्पादन व वितरणाचे थकलेले अनुदान देण्यास शासनाने नकार दिल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कंपन्यांच्या संचालकांनी शनिवारी (ता.३१) कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिस प्रशासनाची एकच दमछाक झाली. या वेळी पोलिसांनी एकूण ११ जणांना ताब्यात घेतले. 

वाशीम जिल्ह्यातील बियाणे उत्पादक शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिल्याने जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. कृषिमंत्री फुंडकर यांच्या खामगाव येथील बंगल्यावर त्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. या प्रकरणी कृषी विभागाने २९ मार्च रोजी वाशीम येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बियाणे उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शनिवारी आत्मदहन करण्याच्या निर्णयावर शेतकरी ठाम होते. त्यानुसार शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत बियाणे उत्पादन व वितरण या दोन्ही बाबीसाठी अनुदान दिले जाते. गत गेल्या काही वर्षांपासून बियाणे उत्पादन व वितरण या दोन्ही बाबीसाठी अनुदान शासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, गट, मंडळांना अनुदान दिले जात होते; परंतु गेल्या हंगामात हे बंद करण्यात आले.  यामुळे वाशीम जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्या, गट, मंडळे अडचणीत सापडले आहेत. अनुदान मिळाले नसल्याने उत्पादक गट व कंपनीच्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे निवेदन देत अनुदानाची मागणी केली आहे.

आता तरी अनुदान मिळेल का?
वेळोवेळी निवेदने देऊन आणि उपोषणे केल्यानंतरही अनुदान मिळाले नव्हते. त्यामुळे शनिवारी आत्मदहन आंदोलन करण्यात आले. निदान आता तरी शासन हे थकलेले अनुदान देऊन संकटात सापडलेल्या शेतकरी कंपन्या, गटांना यातून बाहेर काढेल का, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...