agriculture news in marathi, Farmer Dharma Patil's health information taken by Shetty and | Agrowon

शेतकरी धर्मा पाटील यांची विखे, शेट्टींकडून विचारपूस
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

मुंबई : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी जेजे रुग्णालयात जाऊन मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील उपस्थित होते.

मुंबई : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी जेजे रुग्णालयात जाऊन मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील उपस्थित होते.

श्री. विखे पाटील म्हणाले, की राज्यातील शेतकऱ्यांना मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, हे मागील अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटिक महाराष्ट्राचे धोरण मूठभर धनदांडग्यांचा गल्ला भरणारे आणि शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी चिथावणी देणारे धोरण आहे. हे सरकार शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे.

धुळे जिल्ह्यातील एका मंत्र्याला तो मंत्री असल्याने तत्काळ जमिनीची खातेफोड करून मिळते, पण धर्मा पाटील यांसारख्यांना वशिला अन् राजाश्रय नसलेल्या शेतकऱ्यांना मंत्रालयात येऊन विष घ्यावे लागते, ही परिस्थिती सरकारने राज्यात निर्माण केली आहे. हे सरकार शेतकऱ्यांची कमी पैशात बोळवण करण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारी दलालांमार्फत येणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळते. पण दलालाच्या तुंबड्या न भरणाऱ्या शेतकऱ्यांवर जीव देण्याची वेळ येते, असेही श्री. विखे पाटील म्हणाले.

खासदार राजू शेट्टी यांनीही रविकांत तुपकर यांच्यासमवेत शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज्यातील शेतकऱ्यांना मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, हे या घटनांमधून स्पष्ट झाले आहे, असे खासदार राजू शेट्टी या वेळी म्हणाले. भ्रष्टाचार, शेतकऱ्यांविषयी अनास्था आणि दलालांची बजबजपुरी यामुळे हे सरकार सामान्य माणसांसाठी काम करत नसल्याचे ठसठशीत उदाहरण समोर आल्याचे खासदार शेट्टी  म्हणाले.

दरम्यान, धर्मा पाटील यांच्या मुलाने सरकारने दिलेली १५ लाख रुपयांची मदत नाकारली आहे. जर सरकारने योग्य मदत दिली नाही तर बापाने मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मी दिल्लीत जाऊन आत्महत्या करेन, असा इशाराही नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

इतर बातम्या
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
खानदेशात पपईचे पीक जोमात धुळे : यंदा पपईचे पीक कमी पाऊस असतानाही सातपुडा...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
मराठवाडा भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावरऔरंगाबाद : दुष्काळाची छाया गडद झालेल्या...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
'दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यांतील...सोलापूर : ‘‘दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यांतील...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
‘दुष्काळाच्या निकषांसाठी शासनाने...पुणे : कमी पाऊस झाल्यामुळे सरकारला दुष्काळ जाहीर...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...