agriculture news in Marathi, farmer gave back loan waiver certificate in osmanabad, Maharashtra | Agrowon

कर्ज एक लाख ४० हजार अन् कर्जमाफी साडेदहा हजार
राजेंद्र जाधव
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

उस्मानाबाद ः एक लाख ४० हजार रुपयांचे कर्ज असताना केवळ १० हजार ४०० रुपयांचे कर्जमाफी प्रमाणपत्र देण्यात आले. उर्वरित एक लाख ३० हजार रुपयांची कर्जमाफी का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित करीत भारत तांबे यांनी कर्जमाफीचे प्रमाणपत्र जिल्हा उपनिबंधकांना परत केले.

उस्मानाबाद ः एक लाख ४० हजार रुपयांचे कर्ज असताना केवळ १० हजार ४०० रुपयांचे कर्जमाफी प्रमाणपत्र देण्यात आले. उर्वरित एक लाख ३० हजार रुपयांची कर्जमाफी का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित करीत भारत तांबे यांनी कर्जमाफीचे प्रमाणपत्र जिल्हा उपनिबंधकांना परत केले.

जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात १८ ऑक्टोबर रोजी मोठा गाजावाजा करीत सहपालकमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. त्यात शेतकरी भारत तांबे यांना बोलावून घेऊन कार्यक्रमात कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. सरकारच्या पोर्टलवरील यादीत नाव नसल्याने नाराज झालेल्या श्री. तांबे यांनी सोमवारी (ता. २३) हे प्रमाणपत्र जिल्हा उपनिबंधकांना परत केले.

कर्जमाफीचे प्रमाणपत्र नको, बँकेत पैसे जमा करा, अशी मागणी करीत श्री. तांबे यांनी हे प्रमाणपत्र सरकारला जमा केले. या वेळी श्री. तांबे यांनी प्रमाणपत्राबरोबरच जिल्हा मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेले निवेदनही दिले. 

जिल्हा बँक व एसबीआय बँकेकडून एक लाख ४० हजार रुपयांचे कर्ज काढले होते. त्यानुसार कर्जमाफीसाठी अर्ज केला होता. परंतु केवळ १० हजार ४०० रुपयांचे कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले गेले. मग उर्वरित एक लाख ३० हजार रुपयांची कर्जमाफी का झाली नाही, ती जर होत नसेल तर या प्रमाणपत्राचे काय करायचे, असा प्रश्न त्यांनी या निवेदनाद्वारे केला आहे.

जिल्हा उपनिबंधक जगदाळे यांना श्री. तांबे यांनी हे प्रमाणपत्र परत केले असून, बँकांत विचारणा केली तर खात्यात कुठलेही पैसे जमा नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रमाणपत्र परत केल्याचे श्री. तांबे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात होणार दोन हजार ९६ पीक... पुणे   ः रब्बी हंगामातील पिकांची...
पुणे जिल्ह्यात ११ हजार कांदा चाळींची...पुणे  ः कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यास...
तेवीस कारखान्यांकडून ७७ लाख ६३ हजार टन... औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
पुढील महिन्यापासून ‘समृद्धी’चे काम... वाशीम : नागपूर-मुंबई कृषी समृद्धी जलदगती...
‘वैद्यनाथ साखर’चा परवाना दहा दिवसांसाठी... बीड : अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीत...
शेतीकामासाठी सालगड्यांची कमतरताअमरावती  ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन...
राज्यात ‘जलयुक्त’साठी २०८ कोटींचा निधीनगर ः दुष्काळमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या...
वीजजोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा...नगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही...
चिंचेचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढणारसांगली : चवीने आंबट असणारी चिंच यंदा गोड झाली आहे...
परभणी, नांदेड जिल्ह्यांतील २०१७ गावांना...परभणी : २०१७-१८ च्या खरीप हंगामातील पिकांची...
जलयुक्तच्या कामांना टक्केवारीचे ग्रहणअकोला ः जलयुक्त शिवार योजनेला जसजसा अधिक कालावधी...
कृषी पर्यटनाला मिळणार जुन्नर तालुक्यात...पुणे: आैद्याेगिक विकासाला मर्यादा असल्याने...