agriculture news in Marathi, Farmer Gorakh Ghatge denied loan waiver benefit, Maharashtra | Agrowon

शेतकरी गोरख घाडगे यांनी नाकारली कर्जमाफी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 डिसेंबर 2017

सोलापूर ः शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित हमीभाव द्या, अशी वर्षानुवर्षे मागणी आहे. या प्रश्‍नावर सातत्याने चर्चा होऊनही निर्णय होत नाही, यासारखे शेतीचे अनेक विषय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जातात. शेतकऱ्यांना एखाद्या विषयात गुंतवून ठेवले जाते, कर्जमाफी हाही असाच प्रकार आहे. यासारख्या उपायांमुळे शेतकऱ्यांचे प्रश्‍न कधीच सुटणार नाहीत, त्याला कायमस्वरूपी आधाराची गरज आहे, असे सांगत सरकारचा निषेध करत सांगोला तालुक्‍यातील शिवणेचे शेतकरी गोरख घाडगे यांनी राज्य सरकारची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना नाकारली आहे. 

सोलापूर ः शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित हमीभाव द्या, अशी वर्षानुवर्षे मागणी आहे. या प्रश्‍नावर सातत्याने चर्चा होऊनही निर्णय होत नाही, यासारखे शेतीचे अनेक विषय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जातात. शेतकऱ्यांना एखाद्या विषयात गुंतवून ठेवले जाते, कर्जमाफी हाही असाच प्रकार आहे. यासारख्या उपायांमुळे शेतकऱ्यांचे प्रश्‍न कधीच सुटणार नाहीत, त्याला कायमस्वरूपी आधाराची गरज आहे, असे सांगत सरकारचा निषेध करत सांगोला तालुक्‍यातील शिवणेचे शेतकरी गोरख घाडगे यांनी राज्य सरकारची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना नाकारली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हा बॅंक, महाराष्ट्र बॅंक आणि उपनिबंधकांना यासंबंधीचे निवेदन देऊन ही कर्जमाफी नाकारत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. श्री. घाडगे यांच्याकडे स्टेट बॅंकेचे दुग्ध व्यवसायासाठी काढलेले ३ लाख ३६ हजार, जिल्हा बॅंकेचे ऊसासाठी घेतलेले १ लाख ६६ आणि १ लाखाचे पीककर्ज आहे. यापैकी एखादे खाते या योजनेतून बेबाकी झाले असते. पण त्यांनी ही कर्जमाफी सपशेल नाकारली. 

यासंबंधीच्या निवेदनात श्री. घाडगे म्हणतात, की राज्यात शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर भाव ठरवण्यासाठी जी शेतमाल भाव समिती नेमली आहे, त्याला कोणताही संविधानिक आधार नाही. शिवाय या समित्यांकडून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च काढला जातो, तो कुठेही जुळत नाही, पण तोच शेतकऱ्यांच्या माथी मारला जातो.

वास्तविक, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव देण्यासाठी घटनेतील राज्य घटना कलम ३२३ (ब) (२ग) नुसार कृषि लवाद नेमून शेतीमालाची दर निश्‍चिती होत नाही तोपर्यंत कितीही कर्जमाफी केल्या, अनुदाने दिली, तरी हा प्रश्‍न सुटू शकणार नाही. त्यामुळे कृषि लवाद नेमून हा प्रश्‍न सोडवणे आवश्‍यक आहे. शेतीचे प्रश्‍न जैसे थे असताना या कर्जमाफीचा लाभ काय कामाचा, असेही श्री. घाडगे यांनी म्हटले आहे.

इतर अॅग्रो विशेष
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...