agriculture news in marathi, Farmer group will sale Gram seed | Agrowon

शेतकरी गटही विकणार अनुदानित दरांप्रमाणे हरभरा बियाणे
गोपाल हागे
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

अकोला : शेतकरी गटांकडून ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत दरवर्षी हजारो क्विंटल बियाणे उत्पादित केले जाते. यामुळे शेतकऱ्यांना चांगले व स्थानिक बियाणे मिळत होते. मात्र यासाठी शासनाकडून गटांना म्हणजेच पर्यायाने बीजोत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलला मिळणारे अनुदान गेल्या खरीप हंगामापासून बंद करण्यात अाले अाहे. त्यामुळे शेतकरी गटांनी उत्पादित केलेले हजारो क्विटंल हरभरा बियाणे अनुदानित दरांप्रमाणेच स्वतःच विक्री करण्याचा निर्णय घेतला अाहे.

अकोला : शेतकरी गटांकडून ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत दरवर्षी हजारो क्विंटल बियाणे उत्पादित केले जाते. यामुळे शेतकऱ्यांना चांगले व स्थानिक बियाणे मिळत होते. मात्र यासाठी शासनाकडून गटांना म्हणजेच पर्यायाने बीजोत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलला मिळणारे अनुदान गेल्या खरीप हंगामापासून बंद करण्यात अाले अाहे. त्यामुळे शेतकरी गटांनी उत्पादित केलेले हजारो क्विटंल हरभरा बियाणे अनुदानित दरांप्रमाणेच स्वतःच विक्री करण्याचा निर्णय घेतला अाहे.

शेतकरी गटांना ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत दरवर्षी क्विंटलला अनुदान मिळत होते. मात्र बीजोत्पादन कार्यक्रमातून तयार झालेल्या बियाण्याला गेल्या खरीप हंगामापासून शासनाकडून मिळणारे अनुदान बंद करण्यात अाले अाहे. वारंवार मागणी करूनही शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले असून, रब्बीमध्येही अनुदान मिळण्याची तीळमात्र शक्यता नसल्याने शेतकरी गटांनी उत्पादित हजारो क्विटंल हरभरा बियाणे स्वतःच विक्री करण्याचा निर्णय घेतला अाहे.

या रब्बी हंगामासाठी ‘महाबीज’कडून हरभरा बियाणे ज्या अनुदानित दराने दिले जात अाहे, त्याच ६५ रुपये किलो रुपये दराने गटांकडून जॉकी ९२१८ हे हरभरा बियाणे उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात अाले अाहे.    

शासनाने प्रोत्साहन दिल्याने प्रत्येक जिल्ह्यात विविध शेतकरी गट तयार झाले व त्यांनी ग्रामबीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतला. या गटांनी उत्पादित केलेले बियाणे विकत घेऊन कृषी विभाग शेतकऱ्यांना देत होता. यासाठी शेतकरी गटांना प्रतिक्विंटलला सुमारे २५०० रुपयापर्यंत दर मिळत होता. मात्र या सरकारच्या काळात अधिकाऱ्यांनी निर्णय घेत गटांना बीजोत्पादनासाठी दिलेले जाणारे अनुदान या खरिपापासून थांबविले.

शेतकरी गट, कंपन्यांनी तयार केलेल्या बीजोत्पादनाला अनुदान मिळावे, यासाठी तालुक्यापासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करण्यात अाला. मात्र शासनाने या मागणीकडे अखेरपर्यंत लक्षच दिले नाही. त्यामुळे खरिपात हजारो क्विंटल सोयाबीन बियाणे पडून होते.

रब्बी हंगामातही शासनाकडून हरभरा बियाण्याला अनुदान मिळण्याची शक्यता नसल्याने शेतकरी गटांनी अखेरीस स्वतःच पुढाकार घेत शासन ज्या प्रमाणे अनुदानावर ६५ रुपये किलोने हे बियाणे देत अाहे, त्याच दरात अापले बियाणे देण्याचे ठरविले अाहे.

प्रामुख्याने वाशीम जिल्ह्यातील शेतकरी गट, कंपन्यांनी पुढाकार घेतला. या जिल्ह्यातील श्री. बाळनाथ शेतकरी कृषी विज्ञान मंडळ ६०० क्विंटल, किनखेडा येथील संत ज्ञानेश्वर शेतकरी गट दीड हजार क्विंटल अाणि देऊळगाव बंडा येथील देवळेश्वर कंपनी ५०० क्विंटल बियाण्याची या दराने विक्री करीत अाहे. यासाठी या गट, कंपन्यांनी स्वतःची प्रचार यंत्रणा कामाला लावली अाहे.

इतर बातम्या
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...
मराठवाड्यातील ३२१ गावांना ३९६...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत...
राज्य बँकेने साखर मूल्यांकन १००...कोल्हापूर  : साखर उद्योगाचे शुक्‍लकाष्ट...
मिरजगाव येथे यंत्रणा सुरळीत, मात्र... नगर : तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन...
नांदेड विभागातील २४ कारखान्यांचा गाळप... नांदेड :  नांदेड विभागातील यंदा गाळप सुरू...
व्यापाऱ्यांकडून फसवणूक : मनमाड बाजार...मनमाड, जि. नाशिक  : मनमाड कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव येथे आंबा ४५०० ते ८००० रुपये... जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृषिपंपांच्या वीज थकबाकीवरून...मुंबई  ः सुमारे २३ हजार कोटी रुपयांच्या कृषी...
पुणे जिल्हा बॅंकेकडून चौदा पिकांच्या...पुणे  ः शेतकरी घेत असलेल्या पिकांचा उत्पादन...
विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त...मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निकष पूर्ण...
आमदार-खासदारांची धोरणे व्यापारीहिताचीपरभणी  ः आमदार-खासदारांनी संघटित होऊन...
पीकविमा परताव्यासाठीचे अन्नत्याग आंदोलन...परभणी  ः जिल्ह्यातील पीकविमा परताव्यापासून...
मुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...
दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...
जमिनीवरील अत्याचार थांबवा !पुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...
गुजरातमध्ये उन्हाळी पीक लागवड क्षेत्रात...मुंबई : सरदार सरोवर प्रकल्पातील कमी ...
उष्णतेच्या झळांनी विदर्भ होरपळलापुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट,...
वादळी पावसाने पिकांचे नुकसानपुणे : राज्यात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह...