agriculture news in marathi, farmer loan waive | Agrowon

सांगली जिल्ह्यात 22 हजार शेतकऱ्यांच्या त्रुटींचा डाटा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जानेवारी 2018

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएसचा लाभ न मिळालेल्या 21 हजार 900 शेतकऱ्यांच्या माहितीतील त्रुटी, चुकांचा डाटा जिल्हा बॅंकेला प्राप्त झाला आहे. माहितीची शहानिशा करून दुरुस्त माहिती शासनाला सादर होणार आहे.

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएसचा लाभ न मिळालेल्या 21 हजार 900 शेतकऱ्यांच्या माहितीतील त्रुटी, चुकांचा डाटा जिल्हा बॅंकेला प्राप्त झाला आहे. माहितीची शहानिशा करून दुरुस्त माहिती शासनाला सादर होणार आहे.

कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएससाठी जिल्ह्यातून 1 लाख 83 हजार शेतकऱ्यांनी (कुटुंबे) ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी चार टप्प्यांत शासनाने 87 हजार 523 शेतकऱ्यांना 182 कोटींचा लाभ दिला आहे. यामध्ये 25 हजार 428 शेतकऱ्यांची 90.49 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. 62 हजार 95 शेतकऱ्यांना 91.53 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मिळाले आहे. 26 हजार 494 शेतकऱ्यांना ओटीएस अंतर्गत 188 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी त्यांना ता. 31 मार्च 2018 पर्यंत दीड लाखावरील थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे. दरम्यान कर्जमाफी योजनेसाठी नोंदणी झालेल्या अर्जातील व बॅंकांकडून सादर झालेल्या माहितीत त्रुटी, चुका आढळल्या आहेत. जिल्ह्यातील 21 हजार 900 शेतकऱ्यांच्या माहितीतील त्रुटी, चुकांचा डाटा शासनाकडून आला आहे.

कर्जमाफीसाठीच्या अर्जात थकबाकीदार आहे का, या रकान्यात आहे असे नमूद आहे, पण थकबाकीच्या रकमेच्या रकान्यात शून्य असे नमूद असणे अथवा थकबाकादीर नाही असे नमूद असताना थकबाकीची रक्कम नमूद असणे, कर्जमाफी योजनेचा लाभ 2009 ते 2016 पर्यंतच्या थकीत कर्जाला असताना या तारखेपूर्वीच्या काही तारखांच्या कर्जाचा उल्लेख असणे, थकबाकीची तारीख चुकीची असणे आदी चुका आहेत. माहिती व तारीख चुकीची आहे की कर्जमाफीस अपात्र आहे, याबाबतची शहानिशा केली जाणार आहे. आवश्‍यकतेनुसार दुरुस्ती करून या 21 हजार 900 शेतकऱ्यांची माहिती शासनाला ऑनलाइन पाठविली जाणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...