agriculture news in marathi, farmer loan waive, Marathawada, Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात दीड लाखापर्यंत अकरा लाख थकबाकीदार
संतोष मुंढे
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

अर्ज करण्यास 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर सरकारने कर्जमाफी योजनेच्या यादीत शेतकऱ्यांची नावे आहेत की नाही हे पाहण्याची ऑनलाइन लिंक दिली. ती लिंकही काही तांत्रिक अडचणींमुळे काल-परवापर्यंत ठिक चालत नव्हती. यामुळे शेतकऱ्यांना त्यांची नावे ऑनलाइन यादीत आहेत की नाही हे कळत नव्हते.

औरंगाबाद : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी दिलेल्या पात्रतेच्या कालावधीत राज्यातील तब्बल 36 लाख 10 हजार 216 शेतकऱ्यांकडे दीड लाखापर्यंतचे कर्ज थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मराठवाड्यातील 10 लाख 83 हजार 932 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

राज्यभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत 22 सप्टेबंरपर्यंत मुदतवाढ दिली गेली. या मुदतीनुसार 18 सप्टेंबरपर्यंत राज्यभरातून 99 लाख 80 हजार 743 शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी नोंदणी केली. तर 53 लाख 39 हजार 7 अर्ज आले. त्यामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून आलेल्या 30 लाख 403 शेतकऱ्यांच्या नोंदणीसह 15 लाख 89 हजार 784 अर्जांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दीड लाखापेक्षा जास्त कर्ज थकीत असलेल्या राज्यातील 8 लाख 38 हजार 383 शेतकऱ्यांमध्ये मराठवाड्यातील 1 लाख 56 हजार 133 शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्‌दा ऐरणीवर आल्यानंतर शासनाने तत्त्वत: कर्जमाफीला मान्यता देऊन काही निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सांगीतले.

त्या ऑनलाइन कर्जमाफी अर्जासाठी पीक विम्याप्रमाणेच शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागल्या. आता कर्जमाफी योजनेसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीला दोन दिवसांचा अवधी उरला आहे. दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणेकडूनही योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. 18 सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील 10 लाख 83 हजार 932 शेतकऱ्यांकडे दीड लाखापर्यंतचे कर्ज थकीत आहे.

तर 1 लाख 56 हजार 133 शेतकऱ्यांकडे दीड लाखापेक्षा जास्त कर्ज थकीत आहे. त्यामध्ये सर्वाधिक शेतकरी थकीत कर्जदार शेतकरी जालना जिल्ह्यातील असून त्यापाठोपाठ बीड, परभणी, नांदेड, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यातील दोन्ही प्रकारांतील थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.

कर्जमाफी अर्ज स्थिती (18 सप्टेंबरपर्यंत)

जिल्हा नोंदणी अर्ज
औरंगाबाद 490973 257876
बीड 505252 266675
हिंगोली 198555 105039
जालना 396375 209198
लातूर 354177 187142
नांदेड 479530 257251
उस्मानाबाद 250419 132605
परभणी 325122 173998

 

जिल्हानिहाय थकीत कर्जदार

जिल्हा दीड लाखापर्यंत दीड लाखापेक्षा जास्त
औरंगाबाद 148322 22845
बीड 55165 15585
हिंगोली 55165 9499
जालना 196463 34107
लातूर 80473 13814
नांदेड 156849 21676
उस्मानाबाद 74420 13802
परभणी 163760 24805

 

इतर अॅग्रो विशेष
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...
केवळ जमीन आरोग्यपत्रिकेचा उपयोग नाही :...परभणी :जमीन आरोग्यपत्रिकेतील शिफारशीनुसार...
विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या...पुणे : विदर्भाच्या काही भागांत थंडीत वाढ झाली आहे...
मातीची हाक मातीचा कस घटल्यामुळे मरणपंथाला लागलेल्या जमिनी...
मातीच्या घनीकरणाने घटते उत्पादनजमीन खराब होण्याचे एक महत्त्वाचे कारण   ...
समजून घ्या जमिनीची आरोग्यपत्रिकाबऱ्याच शेतकऱ्यांकडे जमिनीची आरोग्यपत्रिका उपलब्ध...
सावधान, सुपीकता घटते आहे... पुणे : महाराष्ट्रातील भूभागाचे मोठ्या...
अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला जालन्यात...जालना : सर्वांची उत्सुकता लागून असलेल्या सकाळ-...
शून्य मशागत तंत्रातून कस वाढविला...मी १९७६ पासून आजपर्यंत जमिनीची सुपीकता...
सेंद्रिय कर्बावर अवलंबून जमिनीची सुपीकताजमिनीस भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म हे...
भूमिगत निचरा तंत्राद्वारे क्षारपड...सुरू उसात दक्षिण विभागात पहिला क्रमांक उरुण...
अतिपाण्यामुळे क्षारपड होतेय जमीनक्षारपड-पाणथळ जमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी...
जैवइंधन, जैवखते, ठिबक उपकरणांच्या...२९ वस्तू आणि ५३ सेवांच्या जीएसटी दरामध्ये कपात...
प्रगतीच्या दिशेने पाऊलराज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेपासून ते १९९०...
सहकारी बॅंका डिजिटाइज केव्हा होणार?डिजिटल बॅंकिंग याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञानाच्या...
कारखाने, ऊस उत्पादकांचे नुकसान...नवी दिल्ली : साखरेच्या घाऊक दरात घसरण होऊनही...
इंडोनेशिया, चीनला द्राक्ष निर्यातीत...नाशिक : रशिया, चीन, इंडोनेशिया अशा काही देशांनी...
किमान तापमानाचा पारा वाढू लागलापुणे : दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार...
कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम...मुंबई : दुष्काळापासून शेतीचे संरक्षण आणि खारपाण...