agriculture news in marathi, Farmer manufacturers will start dal mills | Agrowon

शेतकरी उत्पादक कंपन्या सुरू करणार डाळ मिल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 डिसेंबर 2017

परभणी : महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या चार शेतकरी उत्पादक कंपन्या वाढीव व्यवसाय आराखड्यानुसार डाळ मिल सुरू करणार आहेत.

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १२ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व कंपन्या धान्याची क्लिनिक ग्रेडिंग, पॅकिंग करून विक्री करणाऱ्या आहेत. यापैकी चार शेतकरी उत्पादक कंपन्यांचे व्यवसाय आराखडे १८ लाख रुपयांचे आणि आठ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे व्यवसाय आराखडे प्रत्येकी १० लाख रुपयांचे होते.

परभणी : महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या चार शेतकरी उत्पादक कंपन्या वाढीव व्यवसाय आराखड्यानुसार डाळ मिल सुरू करणार आहेत.

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १२ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व कंपन्या धान्याची क्लिनिक ग्रेडिंग, पॅकिंग करून विक्री करणाऱ्या आहेत. यापैकी चार शेतकरी उत्पादक कंपन्यांचे व्यवसाय आराखडे १८ लाख रुपयांचे आणि आठ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे व्यवसाय आराखडे प्रत्येकी १० लाख रुपयांचे होते.

यापैकी बोरी (ता. जिंतूर) येथील आचार्य भास्करभट्ट प्रोड्यूसर कंपनी, वर्णा (ता. जिंतूर) येथील वर्णेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, धारासूर (ता. गंगाखेड) येथील धारासूर अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी, देऊळगाव (ता. सेलू) येथील चंद्रबेट अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी या चार शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सुरवातीचे व्यवसाय आराखडे १० लाख रुपयांचे होते. त्यानंतर ८ लाख रुपयांचे डाळ मिल उभारणीचे वाढीव व्यवसाय आराखडे मंजूर करण्यात आले आहेत.

आराखड्यामध्ये शेतकरी कंपनीचा वाटा ४ लाख ५० हजार रुपये आहे. १३ लाख ५० हजार रुपये शासकीय अनुदान यांचा समावेश आहे. लोकवाटा भरल्यानंतर या शेतकऱ्यांना प्रत्येकी ११ लाख ५० हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.

या कंपन्यांनी डाळ मिलच्या उभारणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी केली आहे. उर्वरित २ लाख रुपयांचे अनुदान डाळ मिलची उभारणी करून प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यानंतर वितरित केले जाणार आहे. गतवर्षी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आधारभूत किंमत दराने तूर खरेदी केली होती. शेतकऱ्यांच्या कंपन्यांनी डाळ मिल सुरू केल्यानंतर तूर, मूग, उडीद आदी कडधान्यांचे मूल्यवर्धन होणार असून, त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांतर्गत सभासद शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असे महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाच्या सूत्रांनी सांगितले.

 

इतर बातम्या
कुटुंब एेवजी व्यक्ती घटक माणून कर्जमाफी...नागपूर : "शेतकरी सन्मान योजने" साठी आता कुटुंब...
जात पडताळणीसाठी रक्त नात्यातील दाखला...नागपूर : रक्त नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी...
सर्व इथेनॉल खरेदीची केंद्र शासनाची...नागपूर : अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला...
सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोकोसांगली ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत ‘स्वाभिमानी’चे...नांदेड ः दूध दरवाढीसाठी नांदेड, परभणी, हिंगोली...
मराठा क्रांती ठोक आंदोलकांचा दुसऱ्या...बीड ः : मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय शासनाने...
पीकविमा सर्व्हर ‘अंडर मेंटेनन्स’अकोला  ः या खरीप हंगामात लागवड केलेल्या...
अभिनव पद्धतीने सणसरला आंदोलनभवानीनगर, जि. पुणे   ः सणसर येथील कुरवली...
मराठवाड्यात विविध ठिकाणी चक्‍का जाम...औरंगाबाद : दूध दराच्या प्रश्नावरून ‘स्वाभिमानी’ने...
मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध :...नागपूर : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत...
‘स्वाभिमानी’ने रोखला महामार्गकोल्हापूर : गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान...
पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या दहा...
वऱ्हाडात दूध दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे...अकोला : दूधदरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
खारपाणपट्ट्यात भूसुधारणा कार्यक्रम...अकोला  : जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे प्रमाण...
`एफआरपी`चे कारखाने संघाकडून स्वागतपुणे : साखर कारखाने अडचणीत असतानाही एफआरपीमध्ये...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
साताऱ्यात ‘स्वाभिमानी’चे पदाधिकारी...सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध...
गनिमी काव्याने ‘जाम’पुणे: दूध उत्पादकांनी गनिमी कावा करत राज्यभरात...
...तर मुख्यमंत्र्यांच्या घरातच जनावरे...नागपूर   ः दूधदराचा प्रश्‍न येत्या सोमवार (...
राहुरी येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा...नगर : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे...