agriculture news in marathi, Farmer, military man in distress: Bhujbal | Agrowon

शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

नाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील शेतकरी आणि सैनिक हे दोघेही अडचणीत आहेत. सैनिक शहीद झाल्यानंतर देशाच्या डोळ्यांत अश्रू असताना पंतप्रधानांसह सरकारमधील मंत्री मात्र सभा घेण्यात धन्यता मानत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी रविवारी (ता. १७) केली. 

नाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील शेतकरी आणि सैनिक हे दोघेही अडचणीत आहेत. सैनिक शहीद झाल्यानंतर देशाच्या डोळ्यांत अश्रू असताना पंतप्रधानांसह सरकारमधील मंत्री मात्र सभा घेण्यात धन्यता मानत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी रविवारी (ता. १७) केली. 

झाडी (ता. मालेगाव) येथे चणकापूर उजवा रामेश्वर मार्गे कुंभार्डे-झाडी कालव्याच्या ५ कोटी ८३ लाख रुपये किमतीच्या विकासकामाच्या भूमिपूजनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, प्रसाद हिरे, साहेबराव पाटील, दिलीप इनामदार, तालुकाध्यक्ष संदीप पवार, विक्रम मार्कंड, रघुनाथ परेकर, जळगावचे सरपंच रोडू आहिरे, झाडीचे सरपंच माणिक नेमणार, पुंडलिक होडे, बाळासाहेब दुकळे, दिपक आहिरे, युवक तालुकाध्यक्ष अरुण अहिरे, विनोद चव्हाण, माणिकराव पाटील उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, की नोटबंदीमुळे दहशतवाद कमी होईल असे केंद्र शासनाने सांगितले होते. मात्र देशात आजही सैनिकांवर हल्ले होत आहेत. पुलवामा येथील हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. एकीकडे पाकिस्तान आपल्यावर हल्ला करत असताना पंतप्रधान मात्र न बोलवता पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमास हजेरी लावून केक भरवतात, अशी टीका त्यांनी केली.

सध्याच्या परिस्थितीत आम्ही सरकारसोबत आहोत, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे. दहशतवाद्यांनी अशी कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी आमच्यामध्ये फूट पडणार नाही. आम्ही एकसंध राहू. गेल्या चार वर्षांत युती शासनाने कर्जाचा बोजा साडेपाच लाख कोटी रुपयांवर नेऊन ठेवला आहे. सरकारकडून सर्वसामान्यांना काहीच मिळाले नाही तर हा पैसा गेला कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नारपारचे पाणी गुजरातला जात आहे, ते पाणी महाराष्ट्रालाच मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे. नारपारचे पाणी मालेगाव देवळा भागात आणल्याशिवाय राहणार नाही. असे सांगून दुष्काळाचा प्रश्न सोडविण्याऐवजी डान्सबार सुरू करण्यात सरकार धन्यता मानत असल्याची टीका त्यांनी केली.
 

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...