सोयाबीन अनुदानासाठी शेतकऱ्यांची पायपीट

दाभा, जि. वाशीम ः यादीत नाव शोधण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू अाहे.
दाभा, जि. वाशीम ः यादीत नाव शोधण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू अाहे.

दाभा, जि. वाशीम : गेल्या हंगामात सोयाबीनला दर कमी मिळाल्याने शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले. या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागली अाहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी अनुदानासाठी आवश्यक असलेल्या अटींची पूर्तता केली त्यांचे नावच पात्र किंवा अपात्र यादीत नसल्याने अनुदानापासून आपण वंचित तर राहणार नाही याची भीती दाभा सर्कलमधील शेतकऱ्यांमध्ये वाढली अाहे.

अनेक शेतकऱ्यांचे खाते क्रमांक बरोबर असतानासुद्धा अपात्र यादीत नाव टाकल्याने अनुदान मिळण्यास विलंब होत असल्याचे समोर अाले आहे. गेल्या वर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले होते. परंतु बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर कोसळले होते. सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑक्‍टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत विकलेल्या सोयाबीनसाठी क्विंटलला दोनशे रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले. याची मंगरुळपीर तालुक्यात अंमलबजावणी देखील सुरू झाली अाहे.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जात आहे. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे अनेक शेतकरी अजूनही लाभापासून वंचित आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अनुदानासाठी आवश्यक असलेल्या सर्व अटींची पूर्तता केली त्यांचे नावच पात्र किंवा अपात्र यादीत नसल्याने अनुदानापासून आपण वंचित तर राहणार नाही याची भीती दाभा सर्कलमधील शेतकऱ्यांना लागली आहे.

अनेक शेतकऱ्यांचे खाते क्रमांक बरोबर असतानासुद्धा अपात्र यादीत नाव टाकल्याने अनुदान मिळण्यास विलंब होत आहे. तर काही शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँकेचे आणि अनुदान दुसऱ्या बँकेत पाठवले गेल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ज्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही असे शेतकरी आपले नाव यादीत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी  बँका आणि सहायक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात चकरा मारताना दिसून येत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com