agriculture news in marathi, farmer sold farm due to drought situation, amaravati, maharashtra | Agrowon

संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील शेतकऱ्याने विकली शेती
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या विहिरीवरून पाणी आणले तरी संत्रा बाग वाचविता आली नाही. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली बाग डोळ्यादेखत पाण्याअभावी जळत असल्याचे दुःख सोसवणारे नव्हते म्हणून १२ एकर शेतीच विकण्याचा निर्णय घेतला; अशी व्यथा नयाखेडा (ता. अचलपूर) येथील शेतकरी जानराव येवले यांनी मांडली. 

अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या विहिरीवरून पाणी आणले तरी संत्रा बाग वाचविता आली नाही. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली बाग डोळ्यादेखत पाण्याअभावी जळत असल्याचे दुःख सोसवणारे नव्हते म्हणून १२ एकर शेतीच विकण्याचा निर्णय घेतला; अशी व्यथा नयाखेडा (ता. अचलपूर) येथील शेतकरी जानराव येवले यांनी मांडली. 

संत्रापट्टा पाण्याअभावी अडचणीत आला आहे. पाण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यास संत्रा बागायतदार तयार आहेत. नयाखेडा येथील जानराव यावले हे देखील त्यापैकीच एक. बारा एकरांपैकी चार एकरांवर त्यांनी संत्रा लागवड केली आहे. संरक्षित विहिरीचा पर्याय त्यांच्याकडे होता. विहिरीला दरवर्षी पाणी राहत असल्याने त्यांनी संत्रा लावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कमी होत गेलेल्या पावसामुळे पाणीपातळी खालावत गेली. यावर्षी तर विहिरीने तळ गाठला. आता संत्रा बागेचे काय? असा प्रश्‍न त्यांना भेडसावू लागला. पाणी मिळावे याकरिता त्यांनी एक एक करून तब्बल चार बोअरवेल खोदले. परंतु त्यांना पाणी लागण्याऐवजी डोळ्यातच पाणी दाटले, असे ते अगतिकपणे सांगतात.

चार बोअरवेलच्या खोदकामांवर त्यांचे तीन लाख रुपये खर्च झाले. त्यावरही हिंमत न हारता त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावरून पाणी आणले. शेजाऱ्याला विनवणी करून त्यांच्याकडूनही पाणी मिळविण्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने हे सारे स्रोत कुचकामी ठरले. यापुढे निभाव लागणे शक्‍य नसल्याची जाणीव झालेल्या जानराव यावले यांनी शेवटी संपूर्ण शेतीच विकण्याचा निर्णय घेतला. संत्र्याची झाडे डोळ्यापुढे वाळल्याने मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे जवळपास वीस वर्षे मागे गेल्याची जाणीव होत असल्याची हतबलता त्यांनी व्यक्त केली. 

इतर ताज्या घडामोडी
अडगाव बुद्रुक येथे केली एचटीबीटी बियाणे...अकोला : अडगाव बुद्रुक (ता. तेल्हारा) येथे सोमवारी...
ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी नियोजनग्रामीण भागात जलसंधारण जर यशस्वीपणे दीर्घकाळ...
बदलत्या वातावरणाने घटेल भाताचे उत्पादन...भारतामध्ये वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या...
नगर जिल्ह्यात  ‘उन्नत शेती’बाबत...नगर ः शेतकऱ्यांना अवजारांचा लाभ मिळण्यासाठी...
मराठवाड्यातील १९८ मंडळांत पाऊसऔरंगाबाद  : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर...
धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत...जळगाव : खानदेशात धुळे जिल्ह्यासह जळगाव,...
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब लागवड मोठ्या...
सांगली जिल्ह्यात पाऊस बरसलासांगली : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) ठिकठिकाणी...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई : युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे यांनी...
सोलापुरात पाऊस; पण जोर कमीसोलापूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) रात्री...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई  ः युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे...
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज...आळंदी, जि. पुणे  ः  सुखालागी जरी करिसी...
विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम...मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ....
पुणे जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात...पुणे   : दुष्काळाने होरपळत असलेल्या...
‘जलयुक्त’मधील गैरव्यवहाराची ‘एसीबी’...मुंबई  ः राज्यात जलयुक्त शिवार अभियानातील...
जळगावात भाजीपाला आवकेत घटजळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
पुणे जिल्ह्यात २२० हेक्टरवर भातपीक...पुणे  ः यंदाच्या खरिपात भात उत्पादनवाढीसाठी...
टाटा-कोयनेचे पाणी वळवू नकाः भावे...पुणे  : टाटा व कोयना धरणातील ११५ टीएमसी पाणी...
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...