शेतकरी वस्त्रोद्योगाचा केंद्रबिंदू ः सुभाष देशमुख

मोठ्या वस्त्रोद्योग व्यावसायिकांनी देशातील वस्त्रोद्योग व्यवसायाचा स्तर इतर देशांच्या तुलनेत कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करवेत. त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना या व्यवसायात आवश्यक संधी देऊन सहकार्याने प्रवाहात आणावे. - सुभाष देशमुख, वस्त्रोद्योगमंत्री
सुभाष देशमुख
सुभाष देशमुख

मुंबई :राज्यातच नव्हे, तर देशात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस उत्पादनामागे शेतकऱ्याचे अथक परिश्रम असतात. त्यांनी पिकवलेला कापूस जागतिक वस्त्रोद्योग कंपन्या वापरतात. शेतकरीच जागतिक वस्त्रोद्योग व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी (ता. ६) येथे केले. हॉटेल ताज येथील बॉल रूममध्ये कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आयोजित वस्त्रोद्योग परिषदेत आयोजित करण्यात आली होती त्या वेळी ते बोलत होते. श्री. देशमुख म्हणाले, की मोठ्या वस्त्रोद्योग व्यावसायिकांनी देशातील वस्त्रोद्योग व्यवसायाचा स्तर इतर देशांच्या तुलनेत कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करवेत. त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना या व्यवसायात आवश्यक संधी देऊन सहकार्याने प्रवाहात आणावे.

राष्ट्र वैभवशाली बनवायचे असेल तर मोठ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या कापूस हमीभावाने खरेदी करावा. व्यवसायात शेतकऱ्यांना भागीदारी द्यावी त्यांच्या नवीन संकल्पनेला संधी देऊन लहान मोठ्या सूतगिरण्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरवाव्या. ‘मेक इन महाराष्ट्र’च्या माध्यमातून राज्यात रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न करावा. शेतकऱ्यांची प्रचंड मेहनत करण्याची शक्ती असते त्यांना संधी दिली तर वस्त्रोद्योगात देश प्रथम क्रमांकावर येण्यास फार काळ लागणार नाही. या वेळी वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. कविता गुप्ता विस्डम यार्नस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बाग्रोदिया, वझीर अॅडवायझर प्रायव्हेट लिमिटेडचे प्रशांत अग्रवाल, पॉलिस्टर रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडचे आर.डी. उडेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com