agriculture news in marathi, Farmer training on use of chemical fertilizers, pesticides | Agrowon

रासायनिक खते, कीटकनाशके वापराविषयी शेतकरी प्रशिक्षण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

परभणी ः रासायनिक खते, कीटकनाशकांच्या असंतुलित वापरामुळे पिके, जमिनीच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. शनिवारी (ता. २०) इटलापूर (ता. परभणी) येथे हे प्रशिक्षण झाले.

परभणी ः रासायनिक खते, कीटकनाशकांच्या असंतुलित वापरामुळे पिके, जमिनीच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. शनिवारी (ता. २०) इटलापूर (ता. परभणी) येथे हे प्रशिक्षण झाले.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय अंगीकृत हैदराबाद येथील राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन संस्था यांच्या माध्यमातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालनालयातर्फे राबविण्‍यात येत असलेल्‍या राष्ट्रीय पातळीवरील असंतुलित आणि अनियंत्रित रासायनिक खते, कीटकनाशकांचा पिकांवर होणारा प्रभाव या संशोधन प्रकल्पांतर्गत हे प्रशिक्षण घेण्यात आले.

देशात केवळ सात विद्यापीठांची या संशोधन प्रकल्‍पाकरिता निवड करण्यात आलेली असून, राज्‍यात केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये हा प्रकल्‍प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सोयाबीन आणि वांगी या पिकांमध्ये संशोधन करण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनामकृविचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर होते.

मृदाशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. सय्यद इस्माईल, कीटकशास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. भेदे, डॉ. गणेश गायकवाड उपस्थित होते. डॉ. वासकर यांनी प्रकल्पाची उद्दिष्टे, कोरडवाहू शेती पद्धती, सेंद्रिय पदार्थाचा योग्य वापर, अपांरपरिक पिके लागवड, यात निसर्गाला हानी न पोचवता जमिनीचे आरोग्य कसे राखावे याबाबत माहिती दिली. विद्यापीठाने विकसित केलेल्या ज्वारीच्या परभणी शक्ती वाणाद्वारे मानवी आहारातील अन्नद्रव्यांची कमतरता पूर्ण केली जाऊ शकते, असे सांगितले.

डॉ. सय्यद यांनी सद्यःस्थितीतील अन्नद्रव्यांचा वापर, अन्नद्रव्यांची कमतरता, मानवाच्या आहार, शरीरातील अन्नद्रव्यांचे बदलणारे प्रमाण त्यामुळे उद्भवणारे रोग, समस्या याबाबत माहिती दिली. डॉ. भेदे यांनी पिके त्यांवरील विविध किडी, खत व कीटकनाशकांच्या वापरानुसार किटकांमध्ये होणारे बदल, प्रतिकारक्षमता त्यांचे नियंत्रण याबाबत माहिती दिली.

इतर बातम्या
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
मराठवाड्यात महायुतीचा करिष्मा कायमनांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
पुण्यात गिरीश बापट, बारामतीत सुप्रिया...पुणे  : देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी...
राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभवकोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून...
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...
साताऱ्यात उदयनराजे यांची हॅटट्रिक सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...