प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या 80 वर्षीय शेतकऱ्याने सोमवारी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी तातडीने या शेतकऱ्याला जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्यांन्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.  धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात पाटील यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्यामुळे पाटील हे गेले तीन महिन्यापासून पाठपुरावा करीत होते. मात्र त्यांना लवकर भरपाई मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com