जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
बातम्या
मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या 80 वर्षीय शेतकऱ्याने सोमवारी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी तातडीने या शेतकऱ्याला जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्यांन्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात पाटील यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्यामुळे पाटील हे गेले तीन महिन्यापासून पाठपुरावा करीत होते. मात्र त्यांना लवकर भरपाई मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे.
- 1 of 566
- ››