फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी

फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी
फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी

जिंतूर, जि. परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीत पाण्याअभावी फळबागा वाळूत आहेत, परंतु कवठा (ता. जिंतूर) येथील एक अल्पभूधारक शेतकरी दापंत्याने प्रतिकूल परिस्थितीत हार मानलेली नाही. सलाइनच्या रिकाम्या बाटल्याद्वारे पाणी देऊन फळबाग वाचविण्यासाठी त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. परभणी जिल्ह्यातील अवर्षणप्रवण जिंतूर तालुक्यात यंदा कमी पावसामुळे गंभीर दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. गेल्या महिनभरापासून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. डोंगराळ भागातील हलक्या खडकाळ जमिनीवर फळबागा पाण्याअभावी वाळून जात आहेत. कवडा येथील अल्पभूधारक शेतकरी नारायण मंगू चव्हाण यांनी एक एकर क्षेत्रावर संत्रा, मोसंबी, पेरू आदी मिश्र फळझाडांची लागवड केली. सध्या ही फळझाडे सात महिन्यांची आहेत. दुष्काळी स्थितीमुळे शेतातील विहिरीने तळ गाठला. पाण्याअभावी फळबाग कशी वाचवावी, यामुळे चिंता वाढली.  या परिस्थितीपुढे हार न मानता नारायण चव्हाण आणि त्यांची पत्नी मीराबाई चव्हाण हे दांपत्य कल्पकेतून सलाइनच्या रिकाम्या बाटल्यामध्ये पाणी भरून फळझाडांना देत आहेत. त्यासाठी दूर अंतरावरून बैलगाडीने पाणी आणून शेतातील टाकीमध्ये साठवतात. प्रत्येक फळझाडाला लावलेल्या सलाइनच्या बाटलीमध्ये पाणी भरून नळीद्वारे झाडाच्या बुंध्याजवळ सोडले आहे. दिवसातून दोन वेळा बाटल्यामध्ये पाणी भरावे लागते. या पद्धतीमुळे कमी पाणी लागत असून, अपव्ययदेखील होत नाही. फळझाडांना जिवंत राहण्यासाठी पाणी मिळत आहे. परंतु वादळी वाऱ्यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने या भागातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे चव्हाण दांपत्यांची चिंता वाढली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com