agriculture news in marathi, farmer wait for paddys payment | Agrowon

कडधान्य चुकाऱ्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 जानेवारी 2018

जळगाव : जिल्ह्यात ३१ डिसेंबर रोजी तीनही कडधान्य खरेदी केंद्र सुरू झाले, परंतु अद्याप निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना या केंद्रात विक्री केलेल्या मूग व उडदाचे चुकारे मिळाले नसून, शेतकऱ्यांना चुकारे मिळण्याची प्रतीक्षा आहे.

जळगाव : जिल्ह्यात ३१ डिसेंबर रोजी तीनही कडधान्य खरेदी केंद्र सुरू झाले, परंतु अद्याप निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना या केंद्रात विक्री केलेल्या मूग व उडदाचे चुकारे मिळाले नसून, शेतकऱ्यांना चुकारे मिळण्याची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात नाफेडअंतर्गत मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून जळगाव, पाचोरा व अमळनेर येथे कडधान्य खरेदी केंद्र सुरू झाले होते. शेतकी संघ व बाजार समिती आदींनी सब एजंट म्हणून कार्यवाही केली. शासकीय खरेदी केंद्रात उडदाची अधिक विक्री झाली. परंतु मुगाची विक्री अतिशय कमी झाली आहे. केंद्र बंद झाल्याच्या दिवसापूर्वी १०-१२ दिवस ज्या कडधान्यांची विक्री झाली, त्याचे चुकारे अजून आलेले नसल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनने दिली.

तीनही खरेदी केंद्रांवर उडदाची १५ हजार २०० क्विंटल व मुगाची २९२० क्विंटल खरेदी झाली. उडदाला ५४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. तर मुगाला ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर देण्यात आला.

सोयाबीन खरेदीची मुदत १३ जानेवारीपर्यंत
जिल्ह्यात पाचोरा, अमळनेर व जळगाव येथे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू असून, १३ जानेवारी रोजी ही केंद्रे बंद होतील. या तिन्ही केंद्रांवर सुमारे ६६६ क्विंटल सोयाबीन खरेदी झाल्याची माहिती मिळाली. 

नाफेडच्या कार्यालयातून पैसे येत नसल्याने शेतकऱ्यांचे चुकारे दिले जात नसल्याची कारणे कडधान्य खरेदी करणाऱ्या यंत्रणा देत आहेत. चुकारे मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत.
- किशोर चौधरी, शेतकरी, आसोदे, जि. जळगाव

कडधान्यांच्या खरेदीपोटी मार्केटिंग पाच कोटी ४५ लाख रुपये शेतकऱ्यांना वितरित केले आहेत. मागील १०-१२ दिवसांत ज्यांचे कडधान्य खरेदी केले, त्यांचे चुकारे थकले आहेत. त्यासंबंधी वरिष्ठ कार्यालयाकडून कार्यवाही होत असते.
- परिमल साळुंखे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन

इतर बातम्या
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
नांदेड, परभणी, हिंगोली, लातूरमध्ये आज...नांदेड : लोकसभेच्या नांदेड, परभणी, हिंगोली...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
‘महाबीज’तर्फे बीजोत्पादनासाठी आगाऊ...जळगाव : आगामी खरिपासाठी सोयाबीन, उडीद, मूग, ताग,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यावर संकटनाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
पेमेंट न मिळाल्याने वसाकाच्या ऊस...नाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...