agriculture news in marathi, Farmer waiting for Bond Lily subsidy | Agrowon

शेतकरी बोंड अळी अनुदानाच्या प्रतीक्षेत
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

बुलडाणा : कापूस पिकावर गेल्या हंगामात अालेल्या बोंड अळीच्या संकटानंतर शासनाने मदत जाहीर केली. मात्र, अद्यापही हजारो शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत अाहेत. शेतकरी बँकांमध्ये चौकशी करून थकले अाहेत. बुलडाणा जिल्ह्याला बोंड अळी नुकसानापोटी १३४ कोटी ३४ लाख ३६ हजार रुपये मदत जाहीर झाली होती. त्यापैकी ८९ कोटी ५६ लाख मिळाले. मदतीच्या तिसऱ्या टप्प्यातील अनुदानाच्या प्रतीक्षेत शेतकरी अाहेत.

बुलडाणा : कापूस पिकावर गेल्या हंगामात अालेल्या बोंड अळीच्या संकटानंतर शासनाने मदत जाहीर केली. मात्र, अद्यापही हजारो शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत अाहेत. शेतकरी बँकांमध्ये चौकशी करून थकले अाहेत. बुलडाणा जिल्ह्याला बोंड अळी नुकसानापोटी १३४ कोटी ३४ लाख ३६ हजार रुपये मदत जाहीर झाली होती. त्यापैकी ८९ कोटी ५६ लाख मिळाले. मदतीच्या तिसऱ्या टप्प्यातील अनुदानाच्या प्रतीक्षेत शेतकरी अाहेत.

मागील हंगामात जिल्ह्यात कापसाचे सुमारे एक लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र होते. यापैकी बहुतांश कपाशीचे पीक बोंड अळीच्या प्रादुर्भावाला बळी पडल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणेही कठीण गेले.शेतकऱ्यांना अद्याप ४४ कोटी ७८ लाख ३६ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणे बाकी आहे. कमी पावसामुळे बुलडाणा जिल्हा सध्या होरपळत अाहे.

खरीप हंगामात मूग, उडीद, सोयाबीन पिकांची उत्पादकता घटली अाहे. कपाशीच्या पिकाचे पावसाअभावी किती उत्पादन मिळेल, याची खात्री नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदतीची नितांत गरज अाहे.   
जिल्ह्याला अातापर्यंत मिळालेला दोन टप्प्यांतील ८९ कोटी ५१ लाख २८ हजार ९२१ रुपयांचा निधी वितरित झाला अाहे. मदत मिळालेल्या शेतकऱ्यांची एकूण संख्या १ लाख ३६ हजार ८६५ आहे.

मदत मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या (तालुकानिहाय)

बुलडाणा २ हजार ७९३
चिखली २ हजार ८
मोताळा २० हजार
मलकापूर १२ हजार २१८
खामगाव  १३ हजार ९०७
शेगाव ७ हजार ९६१
नांदुरा १२ हजार ७२
जळगाव जा. १७ हजार ११२
संग्रामपूर ११ हजार १७१
मेहकर २ हजार १४
लोणार २ हजार ११०
देऊळगाव राजा १६ हजार ६९०
सिंदखेड राजा १६ हजार ८०९

 

 

इतर ताज्या घडामोडी
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...