खानदेशातील साखर कारखाने सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

खानदेशातील साखर कारखाने  सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
खानदेशातील साखर कारखाने सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

जळगाव : खानदेशात केवळ चार साखर कारखान्यांचे बॉयलर अग्निप्रदीपन झाले आहे. त्यातील दोन कारखाने बुधवारी (ता. ३१) सुरू झाले. अन्य कारखाने सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

जळगाव जिल्ह्यात केवळ मुक्ताईनगर येथील मुक्ताई साखर कारखाना सुरू झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्‍यातील आदिवासी सहकारी साखर कारखाना अलीकडेच सुरू झाला. या कारखान्याकडून सुमारे दीड लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होईल. शहादा तालुक्‍यातील सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा प्रारंभ बुधवारी झाला. या वेळी आमदार एकनाथ खडसे, उदेसिंग पाडवी, कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रजनी नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिरीष नाईक, कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. आर. पाटील आदी उपस्थित होते.

या कारखान्याकडून यंदा सुमारे पाच ते साडेपाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होईल. खानदेशात सर्वाधिक गाळप सातपुडा कारखाना करील, अशी माहिती मिळाली. समशेरपूर (ता.नंदुरबार) येथील ऍस्टिरिया शुगर लि. या कारखान्याचे बॉयलर अग्निदीपनही बुधवारी झाले. हा कारखाना यंदा सुमारे अडीच ते तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करील, अशी माहिती मिळाली.  

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्‍यातील मधुकर व चोपडा तालुक्‍यातील चोपडा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंबंधी अजून तयारी झालेली दिसत नाही. चोपडा कारखान्याकडे शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत. मध्यंतरी पैशांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कार्यवाहीची मागणी केली. मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस बऱ्यापैकी आहे. हा कारखाना लवकरच सुरू होईल, असे चित्र आहे.

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्‍यातील बेलगंगा साखर कारखाना यंदा सुरू करण्याचे नियोजन झाले आहे. या कारखान्यामुळे गिरणाकाठच्या उसाला चांगला उठाव राहू शकेल, असे समजते. सध्या शेतकरी कारखाने सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com