राज्यातील ४२१ मंडळांतील शेतकरी बोंडअळी नुकसान भरपाईसाठी पात्र

बोंडअळी
बोंडअळी

परभणी ः बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीअंतर्गत आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. परंतु ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीची अट लावण्यात आल्यामुळे राज्यातील १९ जिल्ह्यांतील ४२१ महसूल मंडळांतील शेतकरी आर्थिक मदतीसाठी पात्र ठरणार आहेत. राज्यातील २४ कापूस उत्पादक जिल्ह्यांतील ७४१ मंडळांतील असंख्य बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी लावलेल्या अटी व शर्तीचा फटका बसला आहे. पिकांवर होणारे कीड हल्ले ही बाब नैसर्गिक आपत्तीअंतर्गत समाविष्ट असल्यामुळे राज्य शासनाने बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना जिरायती क्षेत्रासाठी ६ हजार ८०० रुपये आणि बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये एवढी आर्थिक मदत दोन हेक्टर मर्यादेतपर्यंत देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यासाठी शेतकऱ्यांनी अटी आणि शर्तीची पूर्तता करणे आवश्यक आहे. यामध्ये पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगानुसार मंडळ हा अधिसूचित विमा क्षेत्र घटक म्हणून गृहित धरण्यात आला आहे. त्यानुसार २०१२ ते २०१६ पाच वर्षातील पीक कापणी प्रयोगानुसार आलेले प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादन आणि २०१७ मधील प्रत्यक्ष प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादन यांच्यातील घट ३३ टक्क्यांपेक्षा जास्त आलेल्या मंडळातील शेतकरीच मदतीसाठी पात्र असणार आहेत. या अटीमुळे राज्यातील २४ कापूस उत्पादक जिल्ह्यातील १ हजार १६२ पैकी १९ जिल्ह्यातील ४२१ मंडळातील कापुस उत्पादक शेतकरी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी पात्र ठरणार आहेत. ७४१ मंडळातील शेतकऱ्यांना मदतीसाठी लावलेल्या अटीचा फटका बसला आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली, अदमापूर, कुंडलवाडी, सगरोळी, लोहगांव, मुखेड, बाऱ्हाळी, जहूर, मुक्रमाबाद, जांब बु., येवती, हादगाव, आष्टी, मनाठा, पिंपरखेड, तळणी, तामसा, निवघा बा., देगलूर, हानेगांव, मरखेड, शहापूर, खानापूर, मालेगाव, माहूर, वानोळा, सिंदखेडा, वाई बा., नायगाव, बरबडी, मांजरम, नरसी, मुदखेड, मुगट (एकूण ३४), परभणी जिल्हताली सिंगणापूर, गंगाखेड, राणीसावरगाव, माखणी, महातपुरी (एकूण ५), हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव, हट्टा, टेंभूर्णी (एकूण ३) या मंडळांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे बोंडअळीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. जिल्हानिहाय ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेली मंडळे (एकूण कापूस उत्पादक मंडळ) ः औरंगाबाद ४० (६२), जालना ४५ (४८), बीड १८ (६३),  लातूर ११ (३५), उस्मानाबाद (३,(१५), नांदेड ३४ (७८), परभणी ५ (३८), हिंगोली ३ (३०), बुलडाणा ५७ (९०), अकोला १६ (५१), वाशिम २४ (४६), अमरावती ४५ (८९), यवतमाळ ६६ (१०१), नागपूर ३ (६४),गोंदिया २ (२९),  नाशिक १६ (२९), धुळे २ (३५), जळगांव २४ (८६), नगर ७ (६२).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com