agriculture news in marathi, Farmers aggressive for Palkhed water | Agrowon

पालखेडच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

येवला, जि. नाशिक : येवला तालुका सतत दुष्काळी असूनही शासनाच्या चुकीच्या माहितीमुळे जायकवाडीला पाणी देता यावे, याकरिता ते पाणी कारखानदारांना वापरण्यासाठी येवला तालुक्याचे नाव दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. शासनाचा हा डाव येथील शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवत सोनवणे यांनी केले.

येवला, जि. नाशिक : येवला तालुका सतत दुष्काळी असूनही शासनाच्या चुकीच्या माहितीमुळे जायकवाडीला पाणी देता यावे, याकरिता ते पाणी कारखानदारांना वापरण्यासाठी येवला तालुक्याचे नाव दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. शासनाचा हा डाव येथील शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवत सोनवणे यांनी केले.

पाणीलढा लढण्यासाठी पालखेड डावा कालवा कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. सोनवणे हे पालखेड कालवा कृती समितीचे निमंत्रक असून पालखेड परिसरातील सर्व शेतकरी बांधव या कृती समितीचे सदस्य राहणार आहेत. एरंडगाव येथील पालखेड वसाहतीच्या आवारात रविवारी (ता. २१) कृती समितीची पहिली बैठक झाली. या वेळी लाभ क्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांनी एरंडगाव येथे सरकारचा निषेध करून हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या. या वेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, शेतकरी संघटनेचे अनिस पटेल, एकनाथ गायकवाड, शेरू मोमीन आदींनी मार्गदर्शन केले.

सोनवणे म्हणाले, ‘‘केवळ तहसील कार्यालय आवारातील पर्जन्यमापकावरील नोंदी घेतल्या गेल्याने ही चुकीची माहिती शासनाकडे गेली आहे. केवळ शहरासह नजीकच्या गावचा पाऊस गृहीत धरून येवल्याला दुष्काळाच्या यादीतून वगळले आहे. वास्तविक नगरसूल, अंदरसूल या महसूल मंडळातील सर्व जलाशय कोरडे असून, नदीपात्रही कोरडे आहे. सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. या परिसरात भीषण पाणीटंचाई, चाराटंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत पालखेड डाव्या कालव्याची दोन आवर्तने ही आपल्या हक्काची असून, ती मिळालीच पाहिजे. त्यासाठी रस्त्यावर चक्काजाम करण्याबरोबरच न्यायालयातही धाव घेण्यात येईल.`` या प्रसंगी प्रभाकर रंधे, रतन मढवई, सुनील साताळकर, भगवान ठोंबरे, नवनाथ लभडे, विठ्ठल वाळके, सीताराम गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, वसंत झांबरे, महेबूब शेख आदी उपस्थित होते.

 

इतर बातम्या
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
निलंगा तालुक्‍यात गुऱ्हाळे सुरूनिलंगा, लातूर ः पाण्याअभावी ऊस वाळू लागल्याने व...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...